সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, June 03, 2018

रक्तदानाने डाँ.गिरीधर काळेंच्या सेवेला युवकांचा सलाम

लोकसेवक अँप'चे लोकार्पन;विशेष कार्यपुर्ती निमीत्य तरुणांचा सत्कार
गडचांदूर/प्रतिनिधी:
कोरपना तालुक्यातील बिबी येथील प्रसिद्ध समाजसेवक डाँ.गिरीधरभाऊ काळे यांच्या वाढदिवसानिमीत्य 1 जून ला बिबी येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. परिसरातील 78 युवकांनी रक्तदान करुन समाजसेवक डाँ.गिरीधर काळे यांच्या लोकसेवेला सलाम केला. यावेळी 'लोकसेवक' मोबाईल अँप चे लोकार्पन व परिसरातील युवकांचा विशेष कार्यपुर्तीनिमीत्य सत्कार करण्यात आला.
समाजसेवक डाँ.गिरीधर काळे मित्रमंडळातर्फे आयोजित कार्यक्रमाला उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार, विकास प्रकल्प अधिकारी संजय पेटकर,रक्तदूत मंगेश पाचभाई, अभिनय किनेकर, हाकिम हुसेन, पं.स सदस्य सविता काळे, उपसरपंच आशिष देरकर, मनोज भोजेकर, डाँ.पवार, उपस्थित होते.
समाजसेवक डाँ.गिरीधर काळे मागील 32 वर्षापासून मानवी शरिरातील तुटलेल्या, लचकलेल्या अस्थिरुग्नांवर निशुल्क सेवा करत आहे. चार लाखाहून अधिक रुग्नांवर त्यांनी उपचार करुन रुग्नांना बरे केले आहे. दहावीपर्यंत शिक्षण घेतलेले काळे यांच्या वैद्यकिय सामाजिक कार्याचा गौरव म्हणून ग्रामसभेने त्यांना 'डाँक्टर' ही उपाधी दिली आहे. रोज शेकडो अस्थिरुग्नावर निशुल्क उपचार करणारे समाजसेवक डाँ.गिरीधर काळे यांच्या सेवेला युवकांनी रक्तदान करुन सलाम केला.
यावेळी सामाजिक व शैक्षणिक योगदानाबद्दल दीपक चटप, सुकेश ठाकरे, उमेश पिदूरकर, सुनिल नन्नावरे, सतिश जमदाडे, नितेश मालेकर, प्रफुल्ल क्षिरसागर, विनोद गुरनुले, राहूल मोरे या युवकांचा विशेष कार्यपुर्तीनिमीत्य सत्कार करण्यात आला. समाजसेवक डाँ.गिरीधर काळे यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी असून गरिब रुग्नांसाठी ते देवदूत आहे. त्यांच्या निस्वार्थ लोकसेवेची दखल शासनाने घेणे गरजेचे असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश पोईनकर यांनी तर संचालन दीपक चटप यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समाजसेवक डाँ. गिरीधर काळे मित्रमंडळाचे सतिश पाचभाई, रत्नाकर चटप, पुरुषोत्तम निब्रड,चंदू झुरमुरे, हबीब शेख, सुरज लेडांगे, मंगेश माहूरे, किशोर विधाते, गणपत तुम्हाणे, संतोष बोभाटे, नितीन शेंडे, संदिप पिंगे, महेश नाकाडे, अनिल घुगूल, हिराचंद्र कुमरे, सचिन आसुटकर यांनी परिश्रम घेतले. 
'लोकसेवक' मोबाईल अँप देईल 'ब्लड डोनर'
समाजसेवक डाँ.गिरीधर काळे यांच्या सामाजिक कार्याच्या माहीतीचा प्रसार व प्रचारासाठी 'लोकसेवक' नावाने मोबाईल अँप बनवण्यात आले. गडचांदूरातील साँफ्टवेअर अभियंता सुकेश ठाकरे यांनी हे मोबाईल अँप तयार केले असून गुगल प्ले स्टोअर वर ते उपलब्ध आहे. पाहूण्यांच्या हस्ते या अँप चे लोकार्पन करण्यात आले. या अँपमध्ये डाँ.गिरीधर काळे यांच्या माहीतीसह 'ब्लड डोनर' यांची ही माहीती उपलब्ध असल्याने यातून रुग्नांना रक्तपुरवठा होण्यास मदत होईल. हे अँप 'ब्लड डोनर'मुळे सामाजिक वरदान ठरणार आहे.
                                          -------------------------------------------------------   
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी
 घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 
कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo



শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.