সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, June 03, 2018

कोंढाळी पाणिपुरवठा योजनेचे संयंत्र देखाव्या साठीच

जल शुद्धिकरन संयंत्र अजुनही बंदच

गजेंद्र डोंगरे/ वार्ताहर-कोंढाळी

10कोटी ची पाणिपुरवठा योजना असुनही कोंढाळी ग्रा प चे वार्ड क्र एक मधिल विकास नगर व गावठाण वस्ती(शासन राजस्व विभागामार्फत वितरीत) भागातील नागरिकांना नवीन जलवाहिनी च्या प्रतिक्षेतच असुन उर्वरित गावात होनारे पान्याचे वितरण ही जल शुद्धिकरनाचे केंद्रावर बंद अवस्थेतिल जल शुद्धिकरकरण केंद्रा चे माध्यमा ने अशुद्ध पानी पुरवठा केला जात असल्याचे सांगन्यात आले असुन या बाबद ग्रा. प. चे पानी पुरवाठा विभागाचे तात्रिक कर्मचारी नागेश गौरखेडे व ग्राम विकास अधिकार्यांना वेळो वेळी या बाबद समाजमाध्यमाचे माध्यमातून माहिती दिल्या गेली आहे. ही माहिती मिळाल्यावर ग्रा प कर्मचारी एक दोन दिवस जलशुध्दिकरनाचे पावडर चा वापर करतात, मात्र ठेकेदारा कडून बंद असलेले जलशुद्धिकरन संयंत्र अजूनही सुरू झालेले नाही. यात जल शुद्धीकरन केंद्रावर जल सुद्धि करनाचे संयंत्र बंद असल्याचे आढळून आले . व शुद्धिकरनासाठी मनुष्य बळाचे वापरा साठी बांधन्या आलेली छोटे छोटे टाक्यां मधे नाम मात्र तुरटी चा वापर दिसुन येत होता. या प्रसंगी कोंढाळी चे उप सरपंच एड ललीतमोहन काळबांडे, ग्रा.प. सदस्य स्वप्निल व्यास ,काटोल तालुका भाजप चे महा मंत्री योगेश पाटील गोतमारे यांनी स्वताः कोंढाळी पानिपुरवठा योजनेच्या जल शुद्धिकरन केंद्रा वर बंद पडलेले जल शुद्धिकरन संयंत्र, तुरटी चा अपुरा वापर, जलसुद्धिकरन संय॔त्राचे ओट्यांना चिकटलेला चिला , झालेले विद्दुतिकरन तरी वीज वायर ऊड़मघडेच अश्या एक ना अनेक प्रश्न या प्रसंगी जनप्रतिनिधींनी निदर्शनात आनुन दिले आहे व या सर्व प्रकार पाहिल्यावर कोंढाळीकरांना जाम प्रकल्पातून होनारा पेयजल पाढिपुरवठा व येथील जल शुद्धिकरन केंद्रावरिल अपुर्ण जलशुद्धिकरन पाहता कोंढाळी करांना होनारा पाणि पुरवठा किती शुद्ध होतो हा महत्वाचा प्रश्न ही स्वप्निल व्यास यांनी केला आहे. , जाम प्रकल्पाचे माध्यमातून होनारा पानीपुरवठा होण्यासाठी लागनार्या मोठी व लहान जल वाहिण्या गावातिल काहि भागात नव्याने टाकण्यात आल्या नाहीत, तसेच येथील सध्या जाम प्रकल्पाचे पाणी चाचनी म्हनून सोडल्या जात आहे.. विकास नगर येथील जलवाहिण्या नव्याने टाकन्याचे एम. जी. पी. व जनप्रतिनिधी सोबत झालेल्या बैठकित ठरले होते. मात्र जलवाहिन्यांचे योग्य नियोजन नसल्याने हा पाणी पुरवठा चाचणी असला तरी पाणी साठा असुनही नव्याने जलवाहिन्या चे न टाकाल्याणे पाणी पुरवठा सर्वाना पानी वितरण करतांना फार त्रास जात आहे. आता! पाणी साठा असुनही नवीन जल वाहिनी नसल्याने पाणिपुरवठा नियोजन योग्य प्रकारे होत नाही. तसेच भविष्यात जाम प्रकल्पाचे माध्यमातूनच पाणी पुरवठा करावाच लागेल पण जलवाहिन्या नव्यान न टाकल्याने या समस्यांना विकास नगर वाशियांना सामोरी जावे लागत आहे व पुढे जावे लागनार आहे, अंदाजे दोन हजार नागरिकांना या समस्या साठी ग्रा.प. ,पं.स., जि.प.,व आमदार या जनप्रनिधीं समोर नेहमी वाद टाळण्या साठी नवीन जलवाहीनी घालनेच महत्वाचे आहे. तसेच दहा कोटीची कोंढाळी पाणी पुरवठा योजनेचा हेतू म्हणजे ग्रामपंचायत कोंढाळी भागितील कोंढाळी, सोनेगाव, व शीरमी या भागातील प्रत्येक नागरीकाचे घरापर्यंत शुद्ध व भरपुर पाणी पुरवठा करने आहे असे आहे. तरी विकास नगर शनीचरा शीरमी या भागातही नियोजित पाणी पुरवठा करने बाबद मा. जी .प्र . ने योग्य कार्यवाही अपेक्षितआहे, मात्र सात वर्ष लोटूनही म.जी.प्र. कडून कोंढाळी पाणी पुरवठा योजनेच्या अपुर्ण कामा मुळे कोंढाळी चे अनेक प्रभागअजुनही अपुर्ण पाणि समस्येला समोर जावे लागत आहे व जलशुद्धिकरन केंद्रावरिल अपुर्ण व्यवस्थे मुळे गावकर्यांना अशुद्ध पाणि पुरवठ्याला उपयोगात आनावा लागत आहे अशी उप सरपंच ललीत मोहन काळबांडे व जनप्रतिनिधींनीं प्रत्यक्ष पाहणि केल्यावर माहिती दिली आहे. 

*स्टाॅन्ड बाय विद्दूत पंप ही ना दुरूस्त*
येथील पानीपुरवठा योजनेच्या मुख्य पानी पुरवठा केंद्र व जलशुद्धिकरन केंद्रावर 60अश्वशक्तिच्या अतिरिक्त स्टाॅन्ड बाय विद्दूत प्रत्तेकी एक- एक पंप बसविण्यात आले आहे. मात्र ते दोन्हि अतिरिक्त पंप ना दुरूस्त आहेत, दोन्हि केंद्रा पैकी एकाही केंद्रावरिल नियमित सुरू असलेल्या पंपात बिघाड झाल्यास मा .जी . प्रा. च्या चुकिचे नियोजनाचा फटका कोंढाळी चे वीस हजार नागरिकांना बसुन कृत्रिम पाणी टंचाई ला समोरी जावे लागेल,. अशी माहिती ग्रा. प. सदस्य याकूब पठाण , संजय राऊत, कमलेश गुप्ता यांनी केली आहे,. या प्रकरनी मा .जी. प्रा. चे कार्यकारी अभियंता ई .ई. गव्हानकर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की कोंढाळी पाणिपुरवठा योजने च्या जलशुध्दिकरन केंद्रावरिल बंद सयंत्र लवकरच सुरू करन्यात येतील, तसेच अन्य समस्या टप्प्या टप्याने सोडविने सुरू आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.