সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, June 08, 2018

वर्ध्यामध्ये शेतकऱ्यांचा रास्तारोको, रस्त्यावर दूध ओतून नोंदवला सरकारचा निषेध

वर्धा/प्रतिनिधी:परसोडी टेंभरी येथील संतप्त दूध उत्पादक शेतकऱ्यांनी कृषिमाल आणि दुधाच्या सातत्याने ढासळणाऱ्या दरांविरोधात वेरूळ- आंजी येथे रास्ता रोको केला. आंदोलनादरम्यान दूध रस्त्यावर ओतून राज्य सरकारचा निषेध नोंदवला. सातत्याने दूध आणि कृषि मालाच्या ढासळणाऱ्या किंमती पाहता शेतकऱ्याचे जगणे अवघड झाले असून अद्याप शेतकरी कर्जमाफी मिळाली नसून यांसारख्या अनेक गोष्टींचा समावेश यामध्ये होता.
राज्यभर शेतकरी संघटनेचे सुरू असलेल्या आंदोलनाचे लोन परसोडी टेंभरीसारख्या गावांमध्येही पोहोचले आहे. आंदोलनाच्या अंतिम दिवसांमध्येही राज्य सरकारविरोधात आजूबाजूच्या गावांसह तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे.
               दूध उत्पादकांचा शासनाविरोधात एल्गार

Elgar against the government of milk producers | दूध उत्पादकांचा शासनाविरोधात एल्गार

देवळी : तालुक्यातील दूध उत्पादकांनी स्थानिक बसस्थानक चौकात दुधाच्या कॅन रस्त्यावर ओतुन आंदोलन केले. याप्रसंगी शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला. आंदोलनात तालुक्यातील देवळी, नांदोरा, मुरदगाव, सेलसुरा, ईसापूर, दिघी, बोपापूर, सोनेगाव (बाई) आदी गावातील दूध उत्पादकांचा सहभाग होता.शिवराज्याभिषेक दिवसाचे औचित्य साधुन परिसरातील दूध उत्पादकांनी रस्त्यावर येवून एल्गार केला. अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात नेहमीच सन्मान केला आहे. त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळेल याची काळजी घेतली; परंतु त्यांचा हा मावळा आज आपल्या रास्त मागण्यासाठी संप करीत आहे. विंवेचनेपोटी आत्महत्या करीत आहे. त्यांच्या शेतमालाला, बागायती उत्पादनाला तसेच दुधाला भाव मिळत नसल्याने आर्थिक कोंडीचा सामना करीत आहे. नाफेडच्यावतीने करण्यात येणारी चणा, तूर या पीक मालाची खरेदी थांबविण्यात आल्यामुळे तसेच आधी विकलेल्या मालाचे गत दोन महिन्यांपासून पैसे मिळत नसल्यामुळे जीवन कसे जगावे हा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यामुळे आमच्या दुधाला तसेच शेतमालाला योग्य तो भाव द्या, किवां इच्छा मरणाची परवानगी द्या अशी भावनिक हाक या परिसरातील कास्तकारांनी दिली आहे. याप्रसंगी तहसीलदार प्रदीप वर्पे यांना निवेदन दिले.
कास्तकारांनी या आंदोलनादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार केला. शेतकऱ्यांच्या विरोधात असलेल्या शासनाचा निषेध नोंदविला. या आंदोलनात नगरसेवक पवन महाजन, महादेव कामडी, महेश येळणे, बापू डहाके, संदीप कायरकर, ज्ञानेश्वर कामडी, लोकेश झाडे, निलेश टिपले, आशिष बोकरे, लोकेश मानकर, सुधीर येळणे, नामदेव ठाकरे, पवन दुबे, चेतन तराळे, रूपेश निकाडे, भूषण झाडे, सतीश तायवाडे, भागवत, विलास झाडे यांच्यासह परिसरातील कास्तकारांची उपस्थिती होती.





শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.