সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, June 11, 2018

योग दिन सर्व शैक्षणिक आणि शासकीय कार्यालयांमध्ये साजरा होणार

 योग दिन सर्व शैक्षणिक आणि
शासकीय कार्यालयांमध्ये साजरा होणार
मुंबई, दि. 11 : संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे. याच दिनाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय योग दिन सर्व शैक्षणिक आणि शासकीय कार्यालयांमध्ये साजरा होणार आहे.
गेल्या जवळपास 5 हजार वर्षापासून अधिक परंपरा असणाऱ्या योग विद्या ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. व्यक्तीच्या शारीरिक आणि आत्मिक विकासासाठी योग विद्या महत्वाची असून राज्यभरात चौथ्या जागतिक योगा दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
युवा वर्गसामान्य व्यक्ती यांना मोठ्या प्रमाणात हा दिन साजरा करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या दिवशी विविध ठिकाणी योगा उत्सवचर्चासत्रकार्यशाळासांस्कृतिक कार्यक्रम इत्यादीचे आयोजन शाळा,महाविद्यालये आणि विद्यापीठे यामधील विद्यार्थ्यांकडून तसेच एनएसएसनेहरु युवा केंद्र इत्यादी युवा संघटनांनीही योगा संबंधातील कार्यकमाचे आयोजन करण्यात यावे असे शालेय शिक्षण विभागाच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. याबरोबरच आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाच्या आयोजनासंदर्भातील अन्य माहिती www.ayush.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी आणि विभाग पातळीवर विभागीय आयुक्त यांनी योग दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच या उपक्रमाकरिता क्रीडा व युवक सेवा आयुक्त यांची राज्यस्तरीय नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करावी.
आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी प्रशिक्षकांना प्रशिक्षण देणेयोगादिन आयोजनाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी लोणावळा आणि पुणे येथील कैवल्यधामसांताक्रूझ येथील दि योगा इन्स्टिट्यूट आणि पुण्याच्या मामणी अय्यंगार मेमोरियल योगा इन्स्टिट्यूट या तीन योग संस्थांनी सहकार्य करण्याचे मान्य केले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून सर्व शाळांमध्ये योगदिन साजरा करण्याच्या सूचना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत सर्व क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. तसेच शासकीय कार्यालयामध्येही आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.