चंद्रपूर- जिल्ह्यात दारुबंदीचा निर्णय इथल्या महिलांनी घेतला आहे. 816 ग्रामपंचायतींपैकी 600 ग्रामपंचायतींनी दारुबंदीचा ठराव घेतला आहे. त्यामुळं दारुबंदी करण्याला माझं प्राधान्य राहिल, एक महिन्यात दारूबंदी झालेली दिसेल असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
महाराष्ट्र टोलमुक्त करू, अशी निवडणुकीपूर्वी घोषणा करणाऱ्या भाजपनं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता भूमिका बदलल्याचा आरोप ेकॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी केला. या प्रश्नावर पत्रकारांनी छेडले असता, मुनगंटीवारांनी केवळ कंत्राटदारांच्या हितासाठी राज्यात ठिकठिकाणी टोल उभारण्यात आले आहेत. यात सर्वसामान्य जनतेची आर्थिक लूट होत आहे. जे टोल कंत्राटदारांच्या भल्यासाठी उभारलेत, ते निश्चितपणे बंद केले जातील, असे प्रत्युत्तर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
सोबतच राणे यांना आता बोलण्याचा काही अधिकार राहिलेला नाही. दर पंधरा दिवसांनी ते नवीन मुद्दे घेऊन येतील. त्याची आता जनता दखल घेणार नाही, असा टोलाही मुनगंटीवारांनी लगावला. चंद्रपूर-गडचिरोली श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.
विदर्भाच्या मुद्यावर मात्र, मुनगंटीवारांनी सावध भूमिका घेतली. जय विदर्भाचा नारा देणारे मुनगंटीवार आता जय महाराष्ट्राच्या भूमिकेत दिसले. कोणतेही राज्य हे जनतेच्या भावनेवर नाही, तर घटना आणि घटनेनं स्थापन झालेल्या पुनर्रचना आयोगाच्या शिफारशीनुसार निर्माण केले जाते, अशी भूमिका त्यांनी घेतली.
मागील सरकारने अनेकांना कर्ज देवून तिजोरी खाली केली आहे. राज्यावर सद्यस्थितीत 3 लक्ष कोटी रुपयांचे कर्ज आहे. या कर्जापोटी 23 हजार कोटींचे व्याज द्यावे लागत आहे. या कर्जामुळे राज्याचा विकास मंदावला आहे. आता आपण वित्तीय शिस्त लावू. त्यादृष्टीने आपण काम करणार असल्याचेही अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. 2007 पासून बांबू धोरण रखडले होते. रखडलेले हे धोरण आता पूर्ण करू. चिचपल्ली येथे बांबू प्रशिक्षण केंद्राचा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपण ठेवणार आहोत. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गरनुले, प्रमोद कडू यांची उपस्थिती होती.