সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, November 16, 2014

स्वच्छतेची सुरवात घरापासून करा- .हंसराज अहिर

चंद्रपूर दि.16- स्वच्छ भारत अभियान स्वयंस्फूर्तपणे राबवून स्वच्छतेची सुरुवात प्रत्येकाने आपल्या घरापासून करावी असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री ना.हंसराज अहिर यांनी केले. झरपट नदी स्वच्छ करणे व स्वच्छ भारत विशेष अभियानातंर्गत आज झरपट नदी येथे जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेच्या वतीने मोहिम राबविण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. 

ना.हंसराज अहिर यांनी झरपट नदीमधील गाळ व गवत काढून झरपट नदी स्वच्छ करण्याच्या महानगरपालिकेच्या योजनेस सुरुवात केली. त्यानंतर नदीचा परिसर झाडूने स्वच्छ करण्यात आला. स्वच्छतेचा थेट संबंध आरोग्याशी असल्यामुळे चंद्रपूरकर नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छतेसह परिसर स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले. पर्यावरण संवर्धनासाठी प्लॉस्टिकचा वापर टाळावा असा सल्ला देतांना प्लॉस्टीकमुळे नाल्या तुबंतात व सर्वत्र घाण होते. ही बाब नागरिकांनी लक्षात घ्यावी व प्लॉस्टीकमुक्त चंद्रपूर ही संकल्पना राबविण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
महापौर राखी कंचर्लावार, आमदार नाना शामकुळे, जिल्हाधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर, गोंडवाना विद्यापिठाचे कुलगुरु डॉ.किर्तीवर्धन दीक्षित, मनपा आयुक्त सुधीर शंभरकर, स्थायी समिती सभापती रामु तिवारी, नगरसेवक संतोष लहामगे, अनिल फुलझेले, रवी गुरुणूले, अंजली घोटेकर, सुष्मा नागोसे, वनश्री गेडाम, श्रीमती वाईकर, धंनजय हुड, राहुल पावडे व नागरिक उपस्थित होते.


नागरिकांच्या घरातील कचरा गोळा करण्यासाठी महानगरपालिका घरपोच घंटा गाडी सेवा सुरु करणार असून यासाठी नागरिकांनी घंटा गाडीवाल्यांना दररोच एक रुपया याप्रमाणे महिण्यासाठी 30 रुपये दयावे असे महापौर राखी कंचर्लावार यांनी सांगितले. नागरिकांकडून पैसे गोळा करण्याचा पालिकेचा उद्देश नसून ही रक्कम देणे कोणालाही परवडण्यासारखे आहे असे त्या म्हणाल्या. महानगरपालिका स्वच्छता मोहिम कायम राबविणार असून आजची मोहिम प्रातिनिधीक स्वरुपाची असून यापुढे मोठया प्रमाणावर स्वच्छतेवर लक्ष केंद्रीत करण्यात येईल.

आमदार नाना शामकुळे, जिल्हाधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर, कुलगुरु किर्तीवर्धन दीक्षित व मनपा आयुक्त सुधीर शंभरकर यांनी यावेळी उपस्थितांना स्वच्छतेचे महत्व पटवून देवून या अभियानात मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी स्वयंसेवी संस्था, औद्योगिक संघटना, आयएमए, कर्मचारी संघटना, सामाजिक संघटना व नागरिकांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.