जिल्ह्यात १० महिन्यात बलात्कार ७९, विनयभंग १६८, छेडछाड ६०
चंद्रपूर - जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात महिलांवरील होत असलेल्या अत्याचारा विरोधात तसेच याबाबत प्रस्थापित सरकार व स्थानिय पोलिस प्रशासनाला सद्बुध्दी मिळण्याबाबत दि. २४ नोव्हें. ला चंद्रपूर विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने स्थानिय गांधी चौक ते जटपुरा गेट पर्यंत सायं. ७ वा. कँडल मार्च काढण्यात येत असल्याची माहिती आज आयोजित पत्रपरिषदेत युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आली.
पत्रपरिषदेत सांगण्यात आले की, जिल्ह्यात मागील १० महिन्यात बलात्कार ७९, विनयभंग १६८, छेडछाड ६० असे महिलांवरील वाढते अत्याचार थांबविण्यासाठी मोठ- मोठी आश्वासने देणाèया सत्ताधारी पक्ष व जिल्ह्यातील पोलिस प्रशासन यावर निर्बंध लावण्यात निष्फळ ठरली आहे. चंद्रपूर पोलिसांकडून लागू करण्यात आलेला महिला सुरक्षा पथक हा जिल्ह्यात केवळ दिखावा ठरत आहे. कारण जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सतत वाढच होत आहे. तसेच नुकताच तुकूम येथे घडलेल्या सामुहिक बलात्कार गुन्ह्यात महिला सुरक्षा पथकातील पोलिस कर्मचाèयाचे नाव समोर आले आहे. त्यामुळे महिलांवरील वाढत्या अत्याचाराला कुठेतरी पोलिस प्रशासन खतपाणी घालीत असल्याचे यावरून समजते. त्यामुळे महिलांवरील अत्याचार रोखण्यात जिल्हा पोलिस व राज्य सरकारला सद्बुध्दी मिळावी यासाठी विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने सोमवार दि. २४ नोव्हें. ला कँडल मार्चचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती आयोजित पत्रपरिषदेत सचिन कत्याल, कुणाल चाहणे, रूचित दवे, दिपक रेड्डी आदींनी दिली.