সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, November 16, 2014

हिरवा बांबू मोफत पुरवा

बांबु कारागीरांची पुर्व विदर्भाची पहीली बांबू परीषद

चंद्रपूर- श्रमिक एल्गारचे वतीने पुर्व विदर्भातील बांबू कारागीरांच्या प्रश्नावर बांबु परीषद चंद्रपूर येथे घेण्यात आली. ‘विदर्भातील लोकांनी जंगल राखला असतांनाही त्यांचेकडुनच टॅक्स घेण्याचा अधिकार कोणी दिला असा सवाल परीषदेचे अध्यक्ष अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी करून बांबू मोफत मिळविण्यासाठी संघर्ष करण्याचे आवाहन केले.
पुर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदीया या जिल्हयात 40 हजाराचे वर बांबु कारागीर असुन बांबू पासुन ताटवे, टोपली इत्यादी वस्तू बनवितात. मात्र यासाठी लागणार हिरवा बांबू वनविभाग पुरवठा करीत नसल्याने व कधी पुरवठा झाल्यास सुकलेला व कुजका तोही न परवडणा-या दराने दिल्या जात असल्याने या व्यवसायावर अवलंबुन असणा-या कुटुबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी श्रमिक एल्गारचे वतीने पुर्व विदर्भातील पहीली बांबू परीषद प्रियदर्शनी सभागुह येथे पार पडली. सभेचे अध्यक्ष अॅड. पारोमिता गोस्वामी होत्या. प्रमुख पाहुणे मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, नागपूरचे विदर्भवादी कार्यकर्ते डाॅ.श्रिनिवास खांदेवाले, उपसंरक्षक नरवणे, विजय सिध्दावार, छाया सिडाम, गुरूदास आत्राम, यांनी मार्गदर्शन केले. बांबूपासुन सरकारला अत्यंत कमी कर मिळत असल्याने बांबू मोफत दिले तरी सरकारला नुकसान होणार नसल्याचे मुख्यवनसंरक्षक संजय ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. ‘बांबू हे निसर्गाची देण असल्याने यावर सरकारचा कोणताच अधिकार नाही त्यावर लोकांचा अधिकार आहे व पश्चिम महाराष्टातीलª लोकांना विदर्भातील लोकांचे प्रश्न माहीत नसल्याने आपणास बांबुपासुन वंचित करीत आहे त्यामुळे वेगळा विदर्भ होणे गरजेचे आहे’ असे मत डाॅ.श्रीनिवास खांदेवाले यांनी व्यक्त केले. या परीषदेत बांबू कारागिरांना पुरेसा व मोफत हिरवा बांबू उपलब्ध करून देण्यात यावा, बांबू कारागीरांची नोंदणी करून वयोवुध्द कारागिरांना मानधन सुरू करावे, बांबू धोरणात कारागीरांसाठी बांबू प्राधान्याने देण्यात यावे, जंगलातील लागवडीयोग्य जमीन कारागीरांच्या गटाला लागवडीसाठी देण्यात यावी, नविन तंत्रज्ञान बांबू कारागीरांना उपलब्ध करून देण्यात यावे, कंेद्रीय वनविश्वविदयालय सुरू करण्यात यावे, बांबू कारागीरांवर लावण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे, बांबू कारागीरांची स्वतंत्र महामंडळ तयार करण्यात यावे, बांबू कारागीरांच्या नोदणीकृत गटाला वित्त व विक्रीची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावे हे ठराव पारीत करण्यात आले.
बांबू परीषदेचे प्रास्ताविक अनिल मडावी यांनी केले. संचालन विजय कोरेवार यांनी तर आभार दिनेश घाटे यांनी मानले.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.