সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, November 18, 2014

सुस्तावलेली जिल्हा परिषद रविवारीही कामात

जिल्हा परिषदेतील सुस्तावलेले वातावरण अलिकडे अचानकपणे बदललेले जाणवत आहे. कधी नव्हते ते तत्परता आता अधिकार्‍यांमध्ये दिसून यायला लागली आहे. जिल्हा परिषदेत जावे तेव्हा अधिकारी आपल्या टेबलवर काम करताना दिसत आहेत. एवढेच नाही तर, केवळ मार्च एंडिगच्या काळात रविवी सुरू राहणारी जिल्हा परिषद अलिकडे रविवारीही सुरू दिसत आहे. अधिकारी आपली पेंडिंग कामे रविवारी उरकून घेताना दिसत आहे. नेमका हा प्रभाव कशाचा असा प्रश्न अनेकांना पडला आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी आशुतोष सलिल यांची ततत्परता सर्वांना ज्ञात आहेत. त्यांनी अलिकडे सर्वांनचे कम टोचल्याने आणि दोन मंत्र्यांचीही भर जिल्ह्यात पडल्याने ही तत्परता असावी, असा कयास आहे.


जिल्हा परिषदेमध्ये अनेक अधिकार्‍यांकडे विविध विभागांचा कार्यभार देण्यात आला आहे. त्यामुळे अधिकारी सध्या त्रस्त आहे. पशुसंवर्धन विभागाचे डॉ. देशपांडे यांच्याकडे सामान्य प्रशासनचा कार्यभार आहे. डीआरडीचे अंकुश केदार यांच्याकडे अतिरिक्त मुख्य कार्यपालनचा कार्यभार आहे. प्राथमिक शिक्षण विभागाचे रविकांत देशपांडे यांच्याकडे माध्यमिकचा कार्यभार आहे. समाजकल्याणचे वाकुलकर यांच्याकडेही अतिरिक्त भार आहे. यांच्यासह अन्य अधिकार्‍यांवरही पदभार आहे. ज्यामुळे विविध कामावर याचा परिणाम पडत आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.