'आपले सरकार' नावाची वेबसाईट आणि अॅप बनवण्याची घोषणा करीत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मराठीतून नव्या सरकारला शुभेच्छा देत आपल्या भाषणाची सांगता केली.
- ते म्हणाले, मराहाष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमाभागातील जनतेच्या प्रश्नांकडे विशेष लक्ष देणार, २५० आणि ५०० लोकसंख्या असलेल्या खेड्यांना पंतप्रधान ग्राम सडक योजना लागू करु
- २०१५ साली होणा-या कुंभ मेळ्याकरता २२ खाती सज्ज असून योग्य तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल - व्याघ्र प्रकल्पाकडे आणि जंगल पर्यटनाकडे आम्ही विशेष लक्ष देऊ -
- ई- टेंडरींग अनिवार्यकरण्यावर आमचा भर असेल -
- मच्छीमारांच्या विकासासाठी नव्या जेट्टी व हार्बर निर्माण करणार -
- उद्योगांसाठी असलेल्या जाचक अटी रद्द करण्यास आमचे सरकार प्रयत्नशील राहिल
- सिंचनाचे रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यास विशेष तरतूद केली जाणार -
- शिवाजी महाराजांचा अरबी समुद्रातील पुतळा आणि इंदू मिल मध्ये डॉ. आंबेडकरांचे स्मारक बांधणार
- पोलिसांना चांगली निवासस्थाने आणि त्यांच्यामुलांच्या शिक्षणा करता सुविधा
- दलित हत्याकांडांतील तपासासाठी विशेष पोलीस पथक