केरळ आणि गुजरातच्या धर्तीवर संपूर्ण महाराष्ट्र व्यसनमुक्त करण्यासाठी महाराष्ट्रातही दारूबंदी लागू करावी, अशी मागणी पर्यावरण व निसर्ग संस्थेच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आली. संस्थेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन दिले.
दारूच्या आहारी गेल्यामुळे अनेक परिवार उद्ध्वस्थ झाले. याबाबत सविस्तर भूमिका मांडण्यासाठी आपण चर्चेलाही तयार असल्याचे संस्थेने मुख्यमंत्र्यांना कळविले. शिष्टमंडळात सचिव मधुकर सुरवाडे, राजेश सोनटक्के, जितेन वासनिक, विजय मेश्राम, के. टी. तिवाडे, डी. यू. इंदूरकर, प्रदीप हजारे, मनोज फुलपाटील, संजय मानकर आदींचा समावेश होता.