रेल रोकोच्या आंदोलनाची घेतली दखल
वरोरा - मध्य रेल्वेच्या वरोरा विभागात नाइट पेट्रोलिंगसाठी एक गॅंगमन पाठविणार असल्याचे सांगताच नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने रेल रोको आंदोलनाचा इशारा दिला. याची दखल घेत रेल्वे प्रशासनाने दोन गॅंगमन पाठविण्याचा निर्णय घेतला.
गॅंगमन रात्रपाळीत रात्री 11 ते सकाळी 7 वाजेपावेतो 4 कि.मी.पर्यंतच्या रेल्वे ट्रॅकची देखभाल करीत असतात. देखभाल करतेवेळी एका गॅंगमनवर रानडुकराने हल्ला केला. त्यात तो कर्मचारी जखमी झाला. एकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने, तर एक गॅंगमन रेल्वे ट्रकमध्ये पाय अडकल्याने जखमी झाला. अशा घटना वारंवार घडत असतानाच एकच गॅंगमन पाठविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. 31 रेल्वे कर्मचारी रेल्वे अधिकाऱ्यांच्या घरी खासगी कामावर ठेवल्याने रात्रपाळीत दोन गॅंगमन दिले जात नसल्याचा आरोप नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला होता. त्यामुळे रात्रपाळीत एकच गॅंगमन पाठविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ही संख्या दोन करावी, अशी मागणी करीत संघटनेने रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे रेल रोको आंदोलन करण्याचा निर्णय संघटनेने घेतला. याची दखल घेत रेल्वे प्रशासनाने रात्रपाळीत दोन गॅंगमन देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.