नवे श्वानपथक : रॅम्बो, ब्रुनो,
सिझर, मायकेल, जॅक्शन करणार गुन्ह्यांचा तपास
नागपूर, : ग्रामीण पोलिस मुख्यालयात श्वानपथक कार्यरत नव्हते. त्यामुळे श्वानपथकाचे कामकाज नागपूर रेल्वे पोलिस दलाच्या मार्फतीने करण्यात येत होते. आता ही उसनवारी बंद होणार आहे. तब्बल 25 वर्षांनी नागपूर ग्रामीणला रॅम्बो, ब्रुनो, सिझर, मायकेल, जॅक्शन हे नवे श्वान दाखल झाले आहेत.
पोलिस मुख्यालय टेकानाका येथे 25 नोव्हेंबर रोजी विशेष पोलिस महानिरीक्षक रवींद्र कदम, पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या हस्ते श्वानपथकाचे शिलावरण करण्यात करण्यात आले.
नागपूर ग्रामीण पोलिस मुख्यालयात मागील 25 वर्षांपासून श्वानपथक कार्यरत नसल्याने कामकाज नागपूर रेल्वे पोलिस दलाच्या मार्फतीने चालायचे. त्यामुळे पोलिस दलामध्ये गुन्ह्याच्या तपासात व इतरही महत्त्वाच्या कामकाजाकरिता बऱ्याच अडीअडचणी येत होत्या. नागपूर ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या प्रयत्नाने पोलिस मुख्यालय टेकानाका येथे नवीन बांधकाम करून नागपूर रेल्वे पोलिस येथील श्वानपथकाचे स्थलांतरण करण्यात आले आहे. यात रॅम्बो, ब्रुनो, सिझर, मायकेल, जॅक्शन या नावाची लॅब्राडोर जातीचे एकूण पाच श्वान आहेत. या श्वानाचा गुन्ह्यांच्या तपासामध्ये तसेच बॉम्बचा शोध लावण्यास मदत घेण्यात येते. अतिमहत्त्वाच्या बंदोबस्तासाठी या श्वानाची मदत पोलिस घेत असतात. नव्याने सुरू झालेल्या पथकामधील श्वानाची देखरेख व त्यांच्या प्रशिक्षणाकरिता पोलिस हवालदार रवींद्र टोंग, राकेश नायडू, खुशाल कांबळे, गजानन मात्रे, केविन जोसेफ, प्रकाश भोयर, कैलास नेवारे, अजय खिरोडे, अश्विन चहांदे, राकेश बब्बेवार यांची नेमणूक पोलिस मुख्यालय येथे करण्यात आलेली आहे.