সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, April 15, 2013

अपघातात वाघीण पिल्लाचा मृत्यू

अपघातात वाघीण पिल्लाचा मृत्यू
चंद्रपूर
चंद्रपूर येथून ४२ किमी अंतरावर असणा-या केळझरजवळील चंद्रपूर-गोंदिया रेल्वे मार्गावर रेल्वेच्या धडकेने झालेल्या अपघातात एका दीड वर्षीय वाघीण पिल्लाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक पिल्लू गंभीर जघमी झालं आहे. मृत्यू झालेलं पिल्लू मादी असल्याचं सांगितलं जात आहे. रेल्वे अपघातात वाघच्या मृत्यूची ही पहिलीच घटना आहे.
चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील चंद्रपूर-गोदिंया सोमवारी पहाटे ४:३०च्या सुमारास ही घटना उघड झाली. गोंदियाहून चंद्रपूरकेड येणा-या रेल्वेच्या धडकेने रात्री ११च्या सुमारास ही घटना घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पहाटे या घटनेची माहिती प्राप्त होताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी वाघिणीच्या मादी पिल्लाच्या डोक्याला जबर मार बसल्यानं त्या पिल्लाचा जागीच मृत्यू झाल्याचे कळले. तर दुस-या पिल्लाला पायाल गंभीर दुखापत झाली असून त्यावर सध्या उपचार सुरू असून त्यात ब-याच अडचणी निर्माण होत आहेत.
पाण्याच्या शोधार्थ वाघीण आणि तिची दोन पिल्लं निघाली असावी आणि रेल्वेरुळ ओलांडताना हा अपघात झाला असवा असा प्राथमिक अंदाज अधिका-यांनी वर्तवला आहे.
दरम्यान, अशा अपघातात वाघाचा मृत्यू होण्याची ही पहिली घटना असली तरी रेल्वेलाइन-रस्ते अपघातात वन्य प्राणी ठार होण्याचे प्रकार वाढले असून त्यासंदर्भात ठोस उपाय करण्यात आले पाहिजेत, अशी मागणी वन्य प्राणी मित्रांनी केली आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.