चंद्रपूर
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या परिसरात वन्य प्राण्याने केलेल्या हल्ल्यात एका १४ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. गेल्या महिनाभरातील हा सातवा बळी असून सततच्या हल्ल्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
चंद्रपूरपासून सुमारे १८ किमीवरील अंतरावर असलेल्या पायली भटाळी गावातील प्रीती बंडू काटकर ही मुलगी सकाळी साडेसातच्या सुमारास आपल्या शेतात गेली होती. तिथे एका रानटी प्राण्याने अचानक तिच्यावर हल्ला केला. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची कुणकुण लागताच सगळे गावकरी शेतावर धावले. वनविभागाला या घटनेची माहिती देण्यात आली. वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे गावकऱ्यांमध्ये तणावाचे वातावरण असून प्राण्यांच्या हल्ल्यापासून गावकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.