चंद्रपूर- ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पासह जिल्ह्यात बिबट आणि वाघाचा धुमाकूळ सुरु असून, वन विभागाने लावलेल्या पिंज-यात एक पूर्ण वाढीचा नर बिबट्या सापडला.
जंगलात सध्या नरभक्षक बिबट्याचा धुमाकूळ सुरु आहे. एकाच बिबट्याने आता पर्यंत ७ जणांचे बळी घेतले आहेत. या बिबट्याला गोळी घालून ठार करण्यासाठी ६ शूटर्स तैनात करण्यात आले आहेत. गेले ५ दिवस बिबट्याने कुठलाही बळी घेतलेला नाही. हि समस्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पा भोवतालच्या बफर क्षेत्रात मुख्यत्वे आढळून आली होती. या बफर क्षेत्रातील अनेक गावात बिबट्या पकडण्यासाठी पिंजरे लावण्यत आले आहेत. यातील एक पिंजरा बोर्डा गावातील जंगलात लावण्यात आला होता. या पिंज-यात एक पूर्ण वाढीचा नर बिबट्या सापडला आहे. हा बिबट्या अडकल्यावर या बिबट्याला तातडीने चंद्रपूर शहरातील रामबाग वन वाटिकेत आणण्यात आले. हा बिबट्या व ७ जणांचे बळी घेणारा बिबट्या एकच आहे किंवा काय याबाबत वरिष्ठ अधिकारी काहीही बोलण्यास तयार नाहीत. हा बिबट्या व कथित नरभक्षक बिबट्याच्या अंगावरील पट्टे व ठिपके यांचा मेळ जुळून आल्यास वन विभागाच्या पिंज-यात योग्य बिबट्या आल्याची पुष्टी होऊ शकते. मात्र अधिकारी सध्या मौन बाळगून असल्याने याबाबत संभ्रमावस्था आहे.