সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, April 21, 2013

संमेलनातून नवी मुक्ताई निर्माण व्हावी

डॉ. प्रतिमा इंगोले यांचे प्रतिपादन
राज्यस्तरीय स्त्रीशक्ती साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन


चंद्रपूर- दि.२0 : अलिकडे समाज स्वास्थ बिघडत असल्याचे आपल्या अवतीभवती घडणार्‍या घटनांवरून दिसून येते. महिलांवरील अत्याचार वाढत आहे. सामाजिकदृष्टया ही बाब निश्‍चितच चांगली नाही. पुरुषांच्या डोळ्यातील विकार नाहिसा करायचा असेल तर ठिकठिकाणी नवी मुक्ताई निर्माण झाली पाहिजे, अशी गरज सुप्रसिध्द कथालेखिका व कादंबरीकार डॉ. प्रतिमा इंगोले यांनी व्यक्त केली.
सुर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंचातर्फे येथील सरदार पटेल महाविद्यालयात आयोजित राज्यस्तरीय स्त्रीशक्ती साहित्य संमेलनाचे आज दुपारी ११.३0 वाजता थाटात उद््घाटन झाले. यावेळी त्या बोलत होत्या. संमेलनाचे उद््घाटन आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले आणि माता जिजाऊ यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रतिमा इंगोले होत्या. स्वागताध्यक्ष म्हणून किशोर जोरगेवार, शोभाताई पोटदुखे, प्राचार्य जे.ए. शेख, सुर्यांश संस्थेचे अध्यक्ष इरफान शेख, सुरेश तालेवार व्यासपिठावर उपस्थित होते. यावेळी प्रतिभा इंगोले पुढे म्हणाल्या, अनेक पुरुष व्यासपिठावर स्त्रीमध्ये शक्ती आहे असे आवर्जुन सांगतो. मात्र त्याच्या घरीच परिस्थिती वेगळी असते. ती बदलली पाहिजे. समाजातील दुष्ट प्रवृत्ती नष्ट करण्याचे सार्मथ्य साहित्यातच आहे आणि असेच साहित्य निर्माण झाले पाहिजे.स्त्रीची सृजणशक्ती हीच मोठी शक्ती आहे. आपली भूमीही सृजणशिल आहे. त्यामुळे बहिणाबाईंनी दोघांनाही आपल्या कवितेत सारखे लेखले आहे.
आ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, साहित्यात थकवा दूर करण्याचे ताकद असते. म्हणूनच पूर्वी आजी जात्यावर चार-चार तास दळण दळताना ओव्या म्हणायची. साहित्य आनंद देते, चिंतामुक्त करते, करमणूक करते, मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे संस्कार देण्याचेही काम साहित्यच करते. स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक एकाग्र राहू शकतात. समाजाला सुसंस्कृत करणारे साहित्य निर्माण करावे. 

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.