चंद्रपूर : स्थानिक किसन ज्वेलर्स, श्रीनाथ ज्वेलर्स येथे झालेल्या चोरीचा गुंता पोलिसांनी
सोडविला आहे. सीसीटीव्ही कॅमेरा, मोबाईलच्या साहाय्याने आरोपीचा शोध लावला आहे. वेगवेगळ्या राज्यांतील
३६ सराफा बाजारामध्ये चोरी करणारी टोळी चंद्रपूर
शहर पोलिसांच्या हाती लागली आहे.
या टोळीमध्ये रजियाबी शेख यासीन (वय ३४), सुङ्कियाबी शेख मुसीर (वय ३६),
नाझिया शेख जावेद शेख
(वय २२), अलिशानबी
रउङ्क खान (वय ४५), मकसूद खान युसूङ्क खान (वय २८), जावेद मुसा गराणा (वय २३), इम्रान खान नूरखान (वय २६),
दिगांबर अंबर गायकवाड
(वय ३५) या आरोपींचा समावेश आहे. सर्व आरोपी जळगाव येथील रहिवासी आहेत.
महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये
वेगवेगळ्या सराङ्का बाजारामध्ये ही टोळी सक्रिय होती. आरोपींकडून सहा मोबाईल,
सोन्याच्या सहा बांगड्या,
एक वाहन, असा पाच लाख सहा हजार रुपयांचा
माल जप्त करण्यात आला. टोळीतील आठही आरोपी नातलग असल्याचे समजते. यामध्ये चार महिला
आणि चार पुरुषांचा समावेश आहे. सराङ्का बाजारामध्ये उच्चभ्रू म्हणून दागिने खरेदीसाठी
जायचे. दागिने खरेदी करण्याचा आव आणायचा आणि इतर सहकाèयांच्या मदतीने दागिने लंपास करायचे, अशी यांची कामाची पद्धत होती.
या टोळीतील महिला बुरखा बांधून येत असल्यामुळे सराङ्का व्यापाèयास त्यांचे चेहरे दिसून येत नव्हते.
या टोळीचा शोध
अनेक राज्यांतील पोलिसांना होता. त्यातच चंद्रपुरात १४ ङ्केब्रुवारी २०१३ रोजी
किसन ज्वेलर्स येथे व तीन ऑक्टोबर २०१२ रोजी श्रीनाथ ज्वेलर्स येथे या टोळीने हात साफ केला. घटनेची तक्रार शहर पोलिस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली. पोलिसांनी या दरोडेखोरांचा
पाठलाग सुरू केला. ता. २२ एप्रिलला औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड- चाळीसगाव हायवेवर या
टोळीला चंद्रपूर पोलिसांनी अटक केली. हे आठही जण एका वाहनात जात होते. या सर्व आरोपींना
न्यायालयाने दोन मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिस तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर
आल्या आहेत. हे आरोपी सराङ्का बाजारामधून सोने चोरत होते. चोरलेले सोने सराङ्का बाजारातच
विकत होते. या टोळीचा शोध इतर राज्यांतील पोलिसांना आहे. या आरोपींना चौकशीसाठी गुजरात,
मध्य प्रदेशात नेणार
असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी राजू भुजबळ यांनी दिली. चंद्रपूरसह अमरावती,
कारंजा, अंमळनेर, धोडाईचा, शहादा, नवापूर, मोतला, धामणगाव, नागपूर इतवारी, नागपूर मोमीनपुरा,
qछदवाडा, खामगाव, नागपूर, वाकी, वडगाव, भिलाई, अकोला, भडगाव, इंदोर, रतलाम, आर्णी, पारशिवनी, शिवणी, ब्रह्मणपूर, रावेर, कजगार, बुरूड, मुक्ताईनगर, बैंतूल मोठा सराङ्का बाजार,
रामपूर, दुर्ग, गडचिरोली, पुणे, अकोला, नाशिक, अहमदनगर या ठिकाणच्या सराङ्का
बाजारामध्ये आठ लोकांच्या या टोळीने हात मारला