সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, April 27, 2013

बिबट जेरबंद करण्यासाठी दहा पिंजरे

अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एस. एस. मिश्रा
    चंद्रपूर दि २७ : वन्यप्राणी मानव संघर्षाला कारणीभुत ठरणाऱ्या बिबटास जेरबंद अथवा ठार मारण्याच्या वन विभागाच्या कार्यवाहीचा अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एस. एस. मिश्रा यांनी आढावा घेतला. बिबट जेरबंद अथवा ठार केले जाणार नाही तोपर्यंत याप्रकरणी केलेल्या कार्यवाहीचा दररोज आढावा घेण्यात यावा असे निर्देश त्यांनी दिले. दोन र्शाप शुटर, एक पुशुवैद्यकीय अधिकारी, टड्ढक्युलाईज साठी वनविभागचे एक तज्ञ, स्थानिक अशासकीय संस्था ग्रामस्‍थ यांचा समावेश आहे. त्यांना नेमून दिलेल्या १ गावात चोवीस तास गस्ती सुरू आहे. या व्यतीरिक्त पद्यमापुर व मामला येथे रॅपिड रिस्पॉन्स टीम तैनात करण्यात आली आहे. संबंधीत‍ टिम कडुन दर तासात बिबट चे हालचालीवर कंटड्ढोल रूमला माहिती देण्यात येत आहे. या व्यतिरीक्त बिबट्यास जरेबंद करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी १० पिंजरे लावण्यात आलेले आहे.
    वनविश्रामगृह चंद्रपूर येथे झालेल्या या आढावा बैठकीस मुख्य वनसंरक्षक बी. एस. के. रेड्डी, मुख्य वनसंरक्षक व संचालक (ताडोबा) विरेंद्र तिवारी, एफडीसीएम चे महाव्यवस्थापक संजय ठाकरे, उपसंचालक कल्याणकुमार, उपसंचालक दोडल, विभागीय वनअधिकारी विनय ठाकरे, वशिष्ट, तिखे व बंडु धोत्रे उपस्थित होते.
    सद्यस्थितीत बिबट्याचे बंदोबस्त करणेसाठी दिवस व रात्री प्रत्येकी तीन पथक कार्यरत असून चंद्रपूर येथे एक नियंत्रक कक्ष स्थापित करण्यात आले आहे. गठीत करण्यात आलेल्या प्रत्येक पथक सहाय्यक वनसंरक्षक यांचे अधिनस्त असून यात दोन र्शाप शुटर, एक पुशुवैद्यकीय अधिकारी, टड्ढक्युलाईज साठी वनविभागचे एक तज्ञ, स्थानिक अशासकीय संस्था ग्रामस्‍थ यांचा समावेश आहे. त्यांना नेमून दिलेल्या १ गावात चोवीस तास गस्ती सुरू आहे. या व्यतीरिक्त पद्यमापुर व मामला येथे रॅपिड रिस्पॉन्स टीम तैनात करण्यात आली आहे. संबंधीत‍ टिम कडुन दर तासात बिबट चे हालचालीवर कंटड्ढोल रूमला माहिती देण्यात येत आहे. या व्यतिरीक्त बिबट्यास जरेबंद करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी १० पिंजरे लावण्यात आलेले आहे.
    प्रभावित क्षेत्रात गावकऱ्यांमध्ये वन्यप्राण्यापासून सतर्कतेबाबत अशासकीय संस्था व स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने जनजागृती करण्यात येत आहे. बिबट्यास जेरबंद करण्यासाठी वनविभाग, पोलीस विभाग, स्थानिक अशासकीय संस्थेचे समन्वय व सहकार्याने कार्य करण्यात येत आहे. प्रभावित क्षेत्रातील ग्रामस्थांनी जंगलात एकटे जाण्याचे टाळण्याचे आवाहन करण्यात आले या सभेस प्रादेशिक वन्यजीव व वनविकास महामंडळाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. जोपर्यंत बिबट जेरबंद अथवा ठार केले जाणार तोपर्यंत दररोज या प्रकरणी केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला जावा व आवश्यकतेनुसार रणनीतीत बदल करण्यात यावा असे निर्देश अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एस. एस. मिश्रा यांनी दिले.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.