सावली- तालुक्यातील मोखाळा येथील महीला दारूबंदी समितीने दारूविक्री करणाÚया व्यक्तीस दारूसह पकडुन पोलीसाचे हवाली केले.
मोखाळा येथे अनेक वर्षापासुन खुलेआम अवैदय दारूविक्री सुरू आहे. यामुळे येथील अनेक महीलांचे संसार उध्वस्त होत आहेत. यामुळे येथील दारूबंदी समिती दारूबंदीची मोहीम राबवित आहे. शनीवारचे रात्रो महीलांनी गस्त घालुन सुरेश गोडसेलवार यास या अवैदय दारूविक्रेत्यास 1575 रूपये मालासह पकडुन पोलीसाचे हवाली केले. सदर विक्रेत्याकडे पिण्याचा परवाना असल्याने त्याचा विक्रीसाठी वापर करीत आहे त्यामुळे त्याचा पिण्याचा परवाना रद्द करण्याची मागणीही समितीने केली आहे. आठवडाभरापुर्वी हयाच समितीने तीन पेटी दारू पकडुन दिली होती. सदर दारू ही व्याहाड खुर्द येथील पटेल वाईन शाॅप व केरोडा येथील चिटनुरवार यांचे परवाना दुकानातुन पुरवठा होत आहे. गावात दोन तेलगु भाषीक व एक गावातील व्यक्ती अवैदय दारूविक्री करीत असतो. समितीच्या दारूबंदी मोहीमेमुळे दारूविक्रेते धास्तावले आहेत. सदर कारवाईत किरण शेंडे, सुशिला मशाखेत्री, मिराबाई मशाखेत्री, लिला उपासे, गयाबाई आजबले, मनुकाबाई मंगर, निर्मला भोयर, निंबुनाबाई मशाखेत्री, कासुबाई नागापुरे, उमेश आजबले, महादेंव कलसार सहभागी होते.