সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, April 29, 2013

पाटण ग्रामपंचायतीने साकारले पहिले आदर्श क्रीडांगण

चंद्रपूर, दि. 29 : जिवती तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात असलेल्या पाटण ग्रामपंचायतीने  पायका व लोक सहभागातून राज्यातील पहिले आदर्श क्रीडागंण साकारले असून या क्रीडांगणाचा लोकार्पण सोहळा नुकताच  जिल्हाधिकारी  विजय वाघमारे  यांच्या हस्ते पार पडला. विकासाच्या दृष्टीने अतिशय दुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यातील पाटण ग्रामपंचयातीने  राज्यात आदर्श ठरावा असे तीन स्वतंत्रा क्रीडागंण तयार केल्याचे वाघमारे यांनी यावेळी सांगितले.
    केंद्र पुरस्कृत  व राज्य शासनाच्या पायका योजनेअंतर्गत पाटण ग्रामपंचायतने जिल्हा परिषद शाळेच्या आवारात कबड्डी, हॉलीबॉल व खो-खो या खेळाचे तीन स्वतंत्र मैदानं तयार केले.  यासाठी ग्रामपंचायतला शासनाकडून 1 लाख रुपयाचे अनुदान  मिळाले असून लोक सहभागातून 30 हजार रुपये उभारण्यात आले. 1 लाख 30 हजार रुपये खर्चून तीन स्वतंत्र मैदानं ग्रामपंचायतने उभारुन गावातील युवक-युवतींच्या क्रीडा विकासाला चालना दिली.  एखाद्या ग्रामपंचायतीने खेळाची तीन स्वतंत्र मैदाने तयार करण्याचा राज्यातील हा पहिलाच प्रयोग असावा.
    पंचायत युवा क्रीडा व खेळ अभियान (पायका) कार्यक्रमाअंतर्गत सर्वांसाठी खेळ हे ध्येय साध्य करण्यासाठी भारतातील सर्व ग्रामपंचायतीला सन 2016-17 पर्यंत खेळाचे आदर्श मैदान, खेळ साहित्य, क्रीडा मार्गदर्शक  आदीसाठी 1 लाख विशेष निधी शासनाने उपलब्ध करुन  दिला आहे. या निधी अंतर्गत शिक्षण विभाग जिल्हा परिषद व युनिसेफ च्या सहाय्याने विकासासाठी खेळ हा कार्यक्रम जिल्हयातील राजुरा, जिवती, गोंडपिंपरी, पोंभुर्णा व चिमूर या पाच तालुक्यातील शाळेमधील मुलांचा व युवकांचा खेळाच्या माध्यमातून विकास हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
चंद्रपूर जिल्हयात सन 2008-9 व 2009-10 या वर्षात आदर्श क्रीडांगण निर्मितीसाठी  170 ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली असून मैदान तयार करण्यासाठी 1 लाख रुपयाचा  निधी ग्रामपंचायतीला हस्तांतरीत करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत जिवती तालुक्यातील  पाटण ग्रामपंचायतीने जिल्हयातील पहिले क्रीडागंण व राज्यातील आदर्श क्रीडागंण तयार करण्याचा मान पटकाविला आहे. इतर ग्रामपंचायतीमध्ये कामे प्रगतीपथावर आहे.
स्थानिक लोकांच्या सहभागातून व शासकीय निधीतून आदर्श मैदानाची निर्मिती करणे शक्य झाले अशी प्रतिक्रीया उपसरपंच भीमराव पवार यांनी व्यक्त केली. पाटण ग्रामपंचायत केवळ खेळातच नाही तर स्वच्छतेच्या बाबतीतही अग्रेसर असून गावातील 75 टक्के घरात नागरिकांनी स्वखर्चाने शौचालय उभारले आहे.
पाटण ग्रामपंचायतीने तयार केलेले  आदर्श क्रीडांगण जिल्हयातील ग्रामपंचायतीसाठी आदर्श असल्याचे जिल्हाधिकारी  विजय वाघमारे यांनी क्रीडांगणाचे लोकार्पण करतेवेळी  सांगितले. यावेळी आमदार सुभाष धोटे, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत डहाळकर, उपविभागीय अधिकारी एम.एम.राऊत, तहसीलदार सूर्यकांत पाटील, युनिसेफचे मयूर पुजारी , जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड व गावकरी उपस्थित होते.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.