সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, January 08, 2018

एकदाचे वीज निर्मिती प्रकल्प बंद करा मात्र चंद्रपूरकरांच्या पिण्याच्या पाण्यात कपात करू नका:किशोर जोरगेवार

चंद्रपूर/प्रतिनिधी:              
                उन्हाळा सुरू होण्या आधीच शहरात भीषण पाण्याची टंचाई सुरू झाली आहे. पाहिले दररोज शासकीय नळ येत होते पण आता दर दोन ते तीन दिवसाच्या अंतराने नळ येत आहेत . त्यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी सुद्धा मिळत नाही पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वन-वन भटकावे लागत आहे. आधीच शहरात 30% जनतेस शासकीय  नळ योजनेद्वारे पाणी पुरवठा होते ते सुद्धा नागरिकांना योग्य रित्या पिण्यासाठी पाणी मिळत नाही. वीज निर्मिती प्रकल्पाला शासनाकडून होत असलेला पाणी पुरवठा कमी करून शहराला नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा तसेच आवश्यक पडल्यास शासनाने वीज निर्मिती प्रकल्प बंद करावे असा प्रश्न उपस्तिथ करत शिवसेना नेते किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले याप्रसंगी नगरसेवक विशाल निंबाळकर, इरफान शेख, विनोद अनंतवार, अशोक खडके, लोकेश कोटरंगे यांची उपस्तिथी होती...

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.