राजकीय दबावाखाली कारवाई होत नसल्याचा
किरपान यांचा आरोप
कारवाई न झाल्यास आमरण उपोशणाचा ईशारा
रामटेकचे कृषी उत्पन्न बाजार समीतीचे मुख्यप्रशासक अनिल लक्ष्मणजी कोल्हे हे व्यवसायाने शिक्षक आहेत मात्र त्यांनी आपण शिक्षक असल्याची माहीती शासनाला सादर केलेल्या शपथपत्रातून लपविली व त्यामुळे त्यांची नियुक्ती मुख्यप्रशासक या पदावर करण्यांत आलीत्यांनी आपला धंदा शेची अर्धसत्य माहीती देवून हे पद लाटले या प्रकरणाची चौकशीचे जिल्हा उपनिबंधक यांचे कार्यालयांत प्रलंबित असून याबाबत अक्षम्य टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप दणका युवा संघटनेचे रामटेक तालुकाध्यक्ष अजय किरपान यांनी बातमीदारांशी बोलतांना केला.याप्रकरणी आठवडाभरांत कारवाई झाली नाही तर आमरण उपोषनाद्वारे केला आहे. रामटेक तालुका कृषी उत्पन्न बाजार समीतीचे अषासकीय प्रशासक मंडळाची नुकतीच राज्य सरकारने घोषणा तसे अधिकृत आदेश नागपुर जिल्हा उपनिबंधक सतीश भोसले यांनी जारी केले व त्यानुसार मुख्य प्रशासक अनिल कोल्हे,उपमुख्यप्रशासक किशोर रहांगडाले व अन्य प्रशासकांनी दिनांक 22 डिसेंबर 2017 रोजी कार्यभार स्विकारला.मात्र अलिकडेच आकोट कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या अतुल माधवराव म्हैसने या संचालकांना अकोल्याचे जिल्हा निबंधक यांनी ते नोकरी करीत असल्याने अपात्र घोशित केल्याने व अशाच कारणांसाठी आकोटच्या बाजार समीतीच्या सभापतीसह सात संचालकांनाही अपात्र घोशित केल्याने रामटेकच्या बाजार समीतीचे नव्याने नियुक्त करण्यात आलेले मुख्यप्रशासक अनिल कोल्हे हे पदावर कसे काय राहू शकतात असा प्रश्न अजय किरपान यांनी उपस्थित केला होता. कोल्हे यांना तात्काळ पदावरून दूर करावे व खोटे शपथपत्र सादर केल्याबाबत पोलीसांत तक्रार दाखल करावी अशी मागणी रामटेक दणका युवा संघटनेने रामटेकच्या सहायक निबंधक भारती काटूळे व जिल्हानिबंधक सतीश भोसले यांचेकडे लेखी तक्रार देवून केली होती. मात्र शासनाकडे तसे अधिकार असल्याचे भोसले यांनी सांगीतले. याबाबत सत्य पडताळण्यासाठी आपण रामटेकच्या सहायक निबंधक भारती काटूळे यांना तात्काळ चौकशी करण्यासाठी तसे आदेश देत आहोत व त्यानंतर शासनाकडे तसा अहवाल सादर करण्याचे आस्वासन यावेळी जिल्हाउपनिबंधक यांनी दणका युवा संघटनेचे संस्थापक व माजी जि.पसदस्य योगेश वाडीभस्मे,तालुकाध्यक्ष अजय किरपान व अन्य सदस्यांना दिले होते.मात्र वीस दिवसांचा अवधी झाला तरीही याबाबत चौकशी झालेली नाही. दरम्यान कोल्हे यांनी शपथपत्रांत त्यांचा धंदा शेतकरी असल्याची खोटी माहीती दिली. शीक्षक असूनही आपण कोणत्याही शासकीय नोकरीत नसल्याचे नमूद केले याबाबत त्यांचेवर भादंवीच्या संबधित कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात यावा अशी तक्रारही ‘दणका’ने रामटेक पोलीस ठाण्यात दिनांक 17 जानेवारी 2018 रोजी दाखल केली आहे.खरेतर डीडीआर यांनी चौकशी करून त्यांना पदावरून हटविणे व पोलीसांत तक्रार दाखल करणे गरजेचे होते मात्र राजकीय दबावाखाली हे होवू शकले नाही.
.‘‘महारास्त्र कृषी उत्पन्न पणण (विकास व विनियम) नियम 1967 चे नियम 41(1) जी च्या तरतुदीनुसार शासकीय सेवक किंवा स्थानीक स्वराज्य संस्थेचा कर्मचारी असेल तर तो बाजार समीतीचा सदस्य होवू शकत नाही असा स्पष्ट नियम असतांना अपात्र मानसाला नियुक्त करण्यात आले ही चुक सुधारण्याऐवजी त्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न स्थानीक आमदार जिल्हयाचे पालकमंत्री यांच्या आशीर्वादाने करीत असल्याचे याप्रकरणी जोरदार चर्चा केली जात आहे.
याप्रकरणी संबधित अधिकारी यांचेवर राजकीय दबाव असल्याने या प्रकरणी चौकशीच्या नावाखाली वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिण्यात आले आहे काय? असा प्रश्न निर्माण झााला आहेनेमके कोणाचे राजकीय दडपण या अधिकारींवर आहे. दबाव आहे म्हणून चुकीची नियुक्ती वैध ठरवायची का? हा सत्ताधिषांचा आपल्या अधिकाराचा दुरूपयोग नाही कां? असे अनेक प्रश्न यानिमीत्ताने रामटेक तालुक्यांत विचारले जात आहेत.यापुर्वी रामटेक तालुका कृषी उत्पन्न बाजार समीतीने कधीही स्वखर्चाने दिनदर्शिका छापल्या नाहीत मात्र यावेळी पहील्यांदाच नवे प्रशासकीय मंडळ पदारूढ होताच अठठेचाळीस हजार रूपयांचा खर्च करून केवळ स्वतःच्या नावाचा उदोउदो करण्यासाठी या दिनदर्शिका छापण्यात आल्याची चर्चा केली जात आहे. सोबतच दोन खुर्च्या 14000 रूपये व आभाराची जाहीरात तीही फक्त एकाच वृत्तपत्रांत रूपये 11500 एकूण 73500 एवढा नियमबाहय खर्च करण्यांत आल्याचे समजते. किरपान यांचेवर वेगवेगळयारीतीने दबाव टाकण्याचा प्रयत्न अनिल कोल्हे करीत असल्याचा आरोप किरपान यांनी केला आहे.