खापा रोडच्या कामामुळे पिकांचे नुकसान
सावनेर खापा राष्ट्रीय राजमार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे सस्त्याच्या षेजारी असलेल्या शेतात रस्त्याची माती उडून कपाशी , तुर, उस या पिकांबर बसून पिकांचे नुकसान झाल्याने संमंधीत शेतक-यांनी वारंवार प्रशासनाला पत्रलिहूनही शेतक-यांना नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करीत असल्याने शेतक-यांनी 8 फेब्रवारीला रास्तारोकोचा निर्णय घेतला आहे.
मागील अडीच महीन्यापासून खापा सावनेर राष्ट्रीय राजमार्ग 753चे चौपदरीकरणाचे काम झपात्याने सूरू असून तेथील रस्त्याच्या कामामुळे आजुबाजूच्या शेतातील पीकांवर धुळवड उडून पीकांचे नुकसान झाले आहे. कापूस
मातीने माखून खराब झाल्याने तो मजूर लावून वेचणे शेतक-यांना परवडत नाही. सोबतच तुरीच्या व उसाच्या पीकांचेही मोठे नुकसान झाले आहे. यासंबंधी दि. 7 डीसेंबर रोजी नुकसानग्रस्त शेतक-यांनी तहसिलदारांना, प्रदुषन नियंत्रण विभाग तसेच राष्ट्रीय राजमार्ग सा.बा.विभागासही पत्र देण्यात आले होते. तसेच संमंधीत शेतक-यांनी पून्हा नव्याने उपविभागीय अधिकारी वर्शाराणी भोसले यांना स्मरण पत्र देउन सात दिवसाच्या आत मोबदला देण्याची मागणी करण्यात आली व न दिल्यास रास्ता रोको तसेच कामबंद आंदोलन करण्याचा इशारा
देण्यात आला होता. परंतू याही उपरांत शासनाने दखल न घेतल्याने व शेतक-यांना नुकसान भरपाई न दिल्याने अखेर शेतक-यांनी दि. 18 जानेवारी रोज गुरूवारी कामबंद आंदोल पुकारले होते. आंदोलनाची तिव्रता पहाता उपविभागिय अधिकारी यांनी आदि. 17 रोजी सायं. 4 वाजता तडकाफडकी बैठक बोलावून शेतक-यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानाच्या भरपाई संमंधी वेळ मागण्यात आली यावर शेतक-यांनी दि. 22 पर्यंत निर्णय न झाल्यास कांमबंद आंदोलन करण्याचे ठरविले होते. यावर दि.22 रोजी निर्णयाकरीता उपविभागीय ठकिस सा.बां. विभागाकडून कोणीही चर्चेस न येता उपविभागीय अधिका-यांच्या आदेशाची अवहेलना करण्यात आली. यावर दि. 31 रोजी झालेल्या बैठकित सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे उपस्थित झालेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता एस.व्ही.ढगे यांनी संमंधीत
प्रकरण वरिष्ठ अधिकारी यांच्याअख्त्यारीत असल्याचे सांगत हात झटकण्यात आले. त्यामुळे शेतक-यांनी 8 फेब्रवारीला रास्तारोकोचा निर्णय घेतला आहे. यावेळी बैठकीत उपविभागीय अधिकारी वर्शाराणी भोंसले, शेतकरी शेशराव डोइ्रफोडे, सेवकराम राउत, विनायक झाडे,बाल्या चोरे,शंकरराव कराव राउत, तेजराम
हकंदे, गुणवंता ठाकरे, संजय कानगो, अषोक चोरे, मंजुर शेख, आनंदराव डोईफोडे, प्रेमलाल सेवके, सचिन झाडे इत्यादी उपस्थित होते.