সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, January 14, 2018

एसटी महामंडळाकडून मराठी तरुणांची थट्टा;मराठीच्या पेपरात 'हिंदी व्याकरणाचे' प्रश्न

st bus साठी इमेज परिणामचंद्रपूर /प्रतिनिधी:                                 मोठ्या दिमाखात 'जय महाराष्ट्र' शब्द मिरविणाऱ्या राज्य परिवहन अर्थात एसटीने अभ्यासू आणि मराठी तरुणांची थट्टा करणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे . 
  एसटीने आपल्या १७३ पदांसाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर ११ जानेवारीला जाहीर झाला. मात्र, प्रश्नपत्रिकेतील एकापाठोपाठ अश्या अनेक चुका असल्याचे चुकांबाबत वारंवार आक्षेप घेऊनही परीक्षार्थीं विध्यार्थ्यांच्या पदरी शेवटी निराशाच पडल्याचं उदाहरण समोर आले आहे . 

राज्य परिवहन महामंडळाने रिक्त पदांसाठी भरती होणार होती. सप्टेंबर २०१७ महिन्यात याची उमेदवार नोंदणी पार पडली. सहायक वाहतूक अधीक्षक आणि वाहतूक निरीक्षक या २ पदांसाठी केवळ चारच दिवसांची पूर्वसूचना देऊन २९ ऑक्टोबर रोजी ऑनलाईन परीक्षा पार पडली. प्रश्नपत्रिकेत किमान ४ प्रश्न चुकीचे असल्याची परीक्षार्थी विद्यार्थ्यांची तक्रार आहे. याची माहिती उमेदवारांनी एसटी प्रशासनाला लगेच ई-मेलच्या माध्यमातून दिली. मात्र या विध्यार्थ्यांना परत कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने विध्यार्थी नाराज झाले . 

११ जानेवारी २०१८ रोजी सहायक वाहतूक अधीक्षक आणि वाहतूक निरीक्षक या दोन्ही पदांसाठीचा निकाल जाहीर करण्यात आला. या निकालात १५० गुणांवर प्राविण्यसुची म्हणजेच (कट ऑफ) रोखण्यात आली. तसचं एसटी महामंडळाने अभ्यासक्रमात मराठी व्याकरण या विषयाचा समावेश केला. ऑनलाईन परीक्षेत मात्र 'हिंदी व्याकरणाचे' प्रश्न विचारण्यात आले. प्रश्नांचा घोळ मराठी, हिंदी आणि गणिताच्या प्रश्नाबाबतही बघायला मिळाला. हा निकाल घेऊन उमेदवारांनी एसटीच्या केंद्रीय कार्यालयाशी संपर्क साधला तेव्हा त्यांना 'हे चालायचेच' असे धक्कादायक उत्तर मिळाले. 

या परीक्षेशी आपला संबंध नसून परीक्षेची जबाबदारी असलेल्या खाजगी कंपनीला विचारा असे संतापजनक उत्तर मिळाले. एसटीने या परीक्षेतून एकूण १७३ उमेदवार निवडले. मात्र, एकाच व्यक्तीची २ पदांवर नियुक्ती केल्याचे उघड झालंय.नेते मंडळींनी केवळ भावनिक आवाहन करत एसटी चा राजकीय फायद्यासाठी वापरून करुन घेतला. मराठी तरुणांवरील अन्याय कसा दूर करणार याचे उत्तर मात्र सध्यातरी ना एस.टी. जवळ आहे. ना खाजगी कपंनीजवळ.
पोटाला चिमटा घेऊन पदभरतीची प्रतीक्षा करणाऱ्या 'मराठी' तरुणांनी आता 'हिंदीचे व्याकरण' अभ्यासाची गरज आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.