रामटेक तालुका प्रतिनिधी:
रामटेक तालुक्यातील हमलापुरी येथील उमरावजी क्रिडा व बहुद्देशिय संस्था व उमरावजी महीला व पुरुष तालीम संघ नगरधनच्या वतीने कुस्तीच्या प्रचार व प्रसारानिमीत्य नगरधनला दिनांक 1 व 2 फेब्रुवारीला पुरुष महीलांच्या भव्य कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यांत आल्या आहेत. साईबाबा मंदीराच्या पटांगणावर या स्पर्धा संपन्न होणार असून आमदार डी.मल्लिकार्जुन रेड्डी यांचे हस्ते उद्घाटन संपन्न होणार आहे.खासदार कृपालजी तुमाने हे अध्यक्षस्थानी राहणारआहेत.
माजी मंत्री राजेंद्र मुळक,आमदार सुनिल केदार,अविनाश पुंड,अमोल देशमुख,माजी खा प्रकाश धव,माजी आमदार आशिष जयस्वाल,आनंदराव देशमुख,पर्यटक मीत्र चंद्रपाल चौकसे,रंजित सफेलकर,वर्षा धोपटे,देवेंद्र गोडबोले,नरेश धोपटे,थोरात साहेब,नगरधनचे सरपंच प्रशांत कामडी,तहसिलदार धर्मेश फुसाटे,सचिन किरपान,नामदेवराव कडुकर,उदयसिंह यादव,ज्ञानेश्वर ढोक व अन्य अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.यावेळी महीला व पुरुषांच्या विविध वयोगटातील कुस्ती स्पर्धा होणार आहेत. महत्वाचे असे की,नागपुर जिल्हयाचे पालकमंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते यशस्वी स्पर्धकांना रोख पारीतोशिके व सन्मानपत्र देवून त्यांचा गौरव करण्यांत येणार आहे. या कार्यक्रमाला कुस्तीप्रेमींनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन उमराव क्रीडा व बहुद्देशिय संस्थेचे अध्यक्ष गजानन मेश्राम यांनी केले आहे.