সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, January 12, 2018

ओबीसींच्या जीवावर मते मिळवून त्यांनाच डावलायचे ही भाजपची कुटनीती- धनंजय मुंडे

ऑनलाईन काव्यशिल्प:  
ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न असो की सत्तेत वाटा देण्याचा मुद्दा असो, स्व. गोपीनाथ मुंडे असो की एकनाथ खडसे असोत, प्रत्येकवेळी भाजपाने ओबीसी समाजावर अन्यायच केला, असा घणाघाती आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. ओबींसींच्या मेहनतीवर मते मिळवायची आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचा, ही भाजपची कुटनीती असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ते गुरूवारी राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे यांच्या वाढदिवसानिमित्त जालन्यात आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी मेळाव्यात बोलत होते.                                                                                           

राज्यातील ओबीसी महामंडळ फक्त नावालाच आहे. या सरकारने ओबीसी समाजासाठी नवीन काहीच केले नाही. साधा नवीन ओबीसी मंत्रीही सरकारतर्फे देण्यात आला नाही. या देशात सर्वप्रथम मंडल आयोगाची अंमलबजावणी शरद पवार यांनी आपल्या राज्यात केली, अशी आठवण त्यांनी उपस्थितांना करून दिली. शरद पवार यांनी १५ वर्षातील सत्तेच्या काळात छगन भुजबळ, सुनील तटकरे, गणेश नाईक , जयदत्त क्षीरसागर आदींच्या माध्यमातून ओबीसी समाजाला संधी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच ओबीसी समाजाला न्याय देऊ शकते, असे मत मुंडे यांनी व्यक्त केले.

भाजपमध्ये ओबीसी नेते आज कुठेच दिसत नाही. जो न्याय कारवाई करताना खडसे यांना दिला त्या न्यायाने प्रकाश मेहता यांच्यावर कारवाई का केली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मराठा आरक्षण शांत करण्यासाठी शिवरायांचे नाव घेऊन शिवस्मारकाचे फक्त भूमिपूजन केले तर विद्यापीठाला नाव देऊन धनगर आरक्षणाच्या विषयाला बगल दिली, असा आरोपही मुंडे यांनी केला. या मेळाव्यासाठी आ. राजेश टोपे, आ. रामराव वडकुते, आ. पंकज भुजबळ, डॉ. हरिश्चंद्र राठोड, रावसाहेब भुजबळ, जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संजय काळबंडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होतेसंबंधित इमेज

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.