সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, January 12, 2018

आमदार किर्तीकुमार भांगडीया च्या सतर्कतेने वाचले दोन जखमींचे प्राण

 चिमूर प्रतिनिधी :   

  चिमूर विधान सभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार भांगडीया हे क्षेत्रात दिवस रात्र  प्रवास करीत असताना त्यांच्या प्रवासात रस्त्यावर अपघात झाल्यास आपली गाडी थांबवून जखमींना मदत कार्य करीत असतात अश्यातच दि ११ जानेवारी च्या रात्री चिमूर वरून नागपूर कडे जात असताना भिसी जवळील कळमगाव फाट्यावर दुचाकी चा अपघात झाला व दोन युवक जखमी अवस्थेत पडले होते तेव्हा आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी गाडी थांबवून  संबंधित यंत्रणेला फोन वरून माहिती देऊन स्वतः मदत केली त्यामुळे त्या दोन जखमी चे प्राण वाचले असून नागपूर येथे उपचार घेत आहे
     दुचाकीने महेंद्र नदेशवर व संदीप राऊत हे  नवीन पोलीस स्टेशन इमारत बांधकाम वरील पेंटिंग काम करणारे असून ते उमरेड वरून चिमूर कडे येत असताना कळमगाव फाट्यावर जवळ डुक्कर आडवा जात असताना दुचाकी च्या धडकेत दुचाकी स्वार गंभीर जखमी होऊन पडले होते तितक्यात चिमूर वरून नागपूर कडे आमदार किर्तीकुंमार भांगडीया हे जात असताना त्याना दिसले गाडी थांबवून  पोलीस  स्टेशन भिसी ला कळवून तात्काळ माहिती दिली तसेच  ठानेदार डांगे घटना स्थळी दाखल झाले भाजप जी प विभाग प्रमुख नितीन गभने याना सुद्धा  माहिती दिली असता तात्काळ रुग्णवाहिका घेऊन आले उपजिल्हा रुग्णालय चिंमुर येथे पाठविण्यात आले गंभीर जखमी झाल्याने त्या जखमींना नागपूर येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले  आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी माणुसकीचे काम केले

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.