चंद्रपूर/प्रतिनिधी:
अवैध दारू विक्री प्रकरणात चंद्रपूर शहरातील दुर्गापूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चौखाजी मारोती पिपरे बक्कल नंबर. 280
यांना चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागा मार्फत 15 हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली .पिपरे हे दुर्गापूर पोलिस स्टेशनचे विद्यमान ठानेदार यादव यांचे रायटर म्हणुन सम्पूर्ण काम सांभाळत असल्याची माहिती आहे.
दारू विक्रीचा खोटा पंचनामा करत दुचाकी व मोबाइल जप्त केला यात गुन्ह्यात जप्त झालेला मुद्देमाल परत करण्यासाठी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चौखाजी मारोती पिपरे यांनी आरोपिस 25000 रूपयाची मागणी केली.मात्र तितकी रक्कम शक्य नसल्याने शेवटी 15 हजार रुपयांवर तडजोड करण्यात आली व ते पोलिस स्टेशनमध्येच देण्याचे ठरविले. या संपूर्ण प्रकरणाची माहिती दारू विक्रेत्याने चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे दिली होती. त्यानुसार बुधवारी सापळा रचून 15 हजार रुपये रोख स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलिस स्टेशनमध्येच पिपरे यांना अटक केली.
जिल्ह्यात दारूबंदी असतांनादेखील विविध प्रकारे जिल्ह्याभरात दारूचा अवैध साठा येतो व तो शहरातील विविध भागातील विकला देखील जातो त्याला पोलिस विभागाचे पाठबळ असल्याचे या प्रकरणातून विश्वासीत समोर येत आहे.आरोपी पिपरे यांचे अवैध धंदेवाल्यांसोबत गोड संबंध असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त /पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील ला.प्र.वि. नागपूर तसेच पोलीस उप अधीक्षक डी.एम. घुगे, ला.प्र.वि.चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे व पो.हवालदार मनोहर एकोणकर , ना.पो.का संतोष येलपुलवार महेश मांढरे,सुभाष गोहोकर,भास्कर चिंचवलकर, मनोज पिदूरकर, समीक्षा भोंगडे,राहुल ठाकरे यांनी पार पडली