ब्रम्हपुरी /प्रतिनिधी:
रात्री अंधाराचा फायदा घेत चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी
तालुक्यातील चकबोथली येथे अॅसिड हल्ला झाल्याची घटना घडली. पिडीत महीला ससिका रविंद्र मसराम वय( 40) वर्ष ही आपल्या 13 वर्षीय मुला सोबत रात्री झोपलेली असताना आरोपीने घरात घुसुन झोपेत असलेल्या महीला व मुलावर अॅसीड फेकले यात महिला व तिचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. महिलेच्या सांगण्यावरून फिर्यादी महिला अंदाजे 45 टक्के व मुलगा अंदाजे २५ टक्के भाजल्या असल्याचे समजते . या घटनेने
ब्रम्हपुरी तालुक्यात सर्वञ खळबळ माजली आहे.या प्रकणी आरोपी अमोल चौधरी याला पोलीसांनी अटक करून
भादवी 307,326,(अ),450 कलमा नुसार गुन्हा दाखल केला आहे .जखम गंभीर स्वरूपाची असल्या कारणाने यांना सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात गडचिरोली येथे हलविण्यात आले आहे . आरोपीने शरीर सुखाची मागणी
केल्याच्या कारणावरुन घडल्याची चर्चा सुरू आहे.या प्रकरणाचा तपास सुरु असून लवकरच हा कोणत्या कारणावरून हा हल्ला करण्यात आला हे समजणार आहे सोबतच आरोपीने अॅसिड
कुठून प्राप्त याचा शोध घेत आहे.