সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, December 26, 2017

6 जानेवारीपासून नागपुरातखासदार सांस्कृतिक महोत्सव


दर्जेदार कार्यक्रमांची नागपूरकरांना मेजवानी

नागपूर-येत्या 6 जानेवारीपासून नागपुरात खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून या निमित्त 28 जानेवारीपर्यंत विविध दर्जेदार कार्यक्रमांची मेजवानी शहरातील रसिकांना मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत आयोजन समितीचे आ. प्रा. अनिल सोले यांनी कार्यक्रमाची रुपरेषा सांगितली.
या बैठकीला वनराईचे गिरीश गांधी, भाजपाचे शहर अध्यक्ष सुधाकर कोहळे, जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, खा. डॉ. विकास महात्मे, खा. अजय संचेती भाजपाचे विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, दक्षिण पश्चिम विधानसभेचे  प्रभारी प्रा. राजीव हडप, आ. सुधाकर देशमुख, आ. समीर मेघे, बैद्यनाथचे सुरेश शर्मा, देवेंद्र पारेख, महापौर नंदा जिचकार, आ. डॉ. मिलिंद माने, आ. विकास कुंभारे, आ. ना. गो. गाणार, जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, जयप्रकाश गुप्ता आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
या महोत्सवाचे उद्घाटन 6 जानेवारी रोजी सायंकाळी 7.30 वाजता ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर होईल. 
शनिवार दिनांक 6 जानेवारी रोजी प्रसिध्द गायक सुदेश भोसले यांचा गाण्याचा कार्यक्रम होईल. दिनांक 7 जानेवारी रोजी अभिजित भट्टाचार्य यांचा गाण्याचा कार्यक्रम होईल. या दोन्ही दिवसांचे कार्यक्रम ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर होईल. दिनांक 11 जानेवारीपासून होणारे सर्व कार्यक्रम सुरेश भट सभागृह रेशीमबाग येथे होतील. दिनांक 11 जानेवारी रोजी सायंकाळी सच्चिदानंद शेवडे यांचे सावरकरांवर उद्बोधन होईल. दिनांक 12 जानेवारी रोजी विवेकानंद जयंतीनिमित्त प्रख्यात व्याख्याते मुकुल कानिटकर यांचे व्याख्यान होईल. दिनांक 13 रोजी इस्कॉनचे गोपालप्रभू महाराज यांचे युवकांना मार्गदर्शन होईल.
दिनांक 14 रोजी राहूल देशपांडे यांचा संगीत कार्यक्रम, 20 जानेवारी रोजी चाण्यक्य मालिकाफेम मनोहर जोशी यांचे नाट्यमंथन, दिनांक 21 जानेवारी रोजी मधुप पांडेय यांचे राष्ट्रीय हिंदी कवी संमेलन, दिनांक 27 जानेवारी रोजी शेखर सेन यांचा ‘कबीर’ हा एकपात्री प्रयोग सादर करण्यात येईल आणि 28 जानेवारी रोजी प्रसिध्द अभिनेत्री व खा. हेमामालिनी यांचे द्रौपदी साकार करणार्‍या नृत्याचा कार्यक्रम होईल. या दरम्यान 11 ते 14 जानेवारी फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.