नागपूर/प्रतिनिधी:
गेल्या १२ दिवसांपासून नागपुरात विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून राज्यभरातील आमदार नागपुरात तळ ठोकून बसले आहेत . याच आमदार निवासात अनेक आमदार देखील वास्तव्यास आहेत. याच आमदार निवासात समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या खोली आहे. आमदार निवासातील व्हरांड्यातून साप आझमींच्या खोलीत घुसला. साप शिरल्याची माहिती मिळताच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. सुरक्षित जागा शोधण्यासाठी इतर आमदारांचीही धावाधाव झाली. थोड्या वेळाने सर्पमित्रांना बोलावण्यात आले. शर्थीच्या प्रयत्नानंतर सापाला पकडण्यात यश आले. यात कुणाचेही नुकसान झाले नाही. मात्र, आमदार निवासात राहणाऱ्या आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या घटनेमुळे आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आझमी यांनी केली आहे.