चंद्रपूर/प्रतिनिधी:
आनंदवनमधील दिव्यांग विद्यार्थ्यांचा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आटोपुन परत येत असतांना स्वरानंदनवनच्या बसला रविवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात डॉ. विकास आमटे यांच्या एका बाळू माटे या सहकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला असून चार ते पाच जण जखमी झाले आहेत. आनंदवनमधील दिव्यांग विद्यार्थ्यांचा ऑर्केस्ट्रा हा मूर्तिजापूर येथे आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम आटोपून ही मंडळी वरोरा येथे परत येत असताना पहाटे 4.30 वाजताच्या सुमारास या कलाकारांच्या बसची उभ्या असलेल्या ट्रकला धडक बसून हा अपघात झाला असल्याची माहिती आहे.हा अपघात चंद्रपूर-नागपूर मार्गावरील खांबाडा-टेमुर्डा दरम्यान रविवारी पहाटे घडला. अक्षय राऊत व मेघराज भोयर या दोघांवर सेवाग्राम येथे उपचार सुरू आहे. अन्य चार जण किरकोळ जखमी असल्याने त्यांच्यावर उपचार करून सुटी देण्यात आल्याचे सेवाग्राम रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.