- 14 डिसेंबरपासुन पुर्वसुचना न देता अनुपस्थित
- शीतलवाडी नागरीकांना पाणी नाही,
- कामकाज थांबले, नागरीकांना असुविधा
सितलवाडी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी आर. डी. मोंढे हे गेल्या 14 डिसेंबरपासून ग्रामपंचायत सरपंच वा अन्य वरीश्ठ अधिकारी यांना कुठलीही पुर्वसुचना न देता गैरहजर आहेत.ग् रामपंचायतच्या सरपंच कु.योगीता गायकवाड यांनी याबाबत रामटेक पं.स.चे गटविकास अधिकारी श्री यावले यांना लेखी कळविले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की सितलवाडी या ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी आर.डी.मोंढे हे गेल्या पाच दिवसांपासून सरपंच वा अन्य कुणालाही न सांगता गैरहजर आहेत.त्यांनी याबाबत गटविकास अधिकारी यांनाही कुठलीच लेखी सुचना दिलेली नाही.आपल्या पत्रांत ग्रामविकास अधिकारी यांच्या अनुपस्थितीवरून सरपंच योगीता गायकवाड यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली आहे.
थ्दनांक 15 डिसेंबर 2017 रोजी जि.प.नागपुरला उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या दालनात नागरी सुविधेच्या संदर्भात अत्यंत महत्वाची सभा होती मात्र या सभेलाही मोंढे अनुपस्थित होते.ग्रामपंचायत प्रषासन तसेच नागरीकांना षासकीय कामकाजासाठी ग्रामपंचायतकडून अनेक प्रकारची प्रमाणपत्रे लागतात ती यांच्या अनुपस्थितीमुळे लोकांना मीळत नसल्याने त्यांची फारच गैरसोय होत असल्याचे गायकवाड यांनी पत्रात नमूद केले आहे.नगरधन पाणीपुरवठा योजनेचे थकीत विजबिलाची रक्कम न भरल्याने विजपुरवठा खंडीत करण्यात आला असून गेल्या चार दिवसांपासून नागरीकांना पाण्याचा पुरवठा बंद आहे.ग्रामविकास अधिकारी नसल्याने विजेचे बिल भरता आले नसल्याने हे गंभीर संकट निर्माण झाले आहे.या ग्रामविकास अधिकाÚयांवर तात्काळ कार्यवाही करावी अषी मागणी या पत्रातून सरपंच गायकवाड यांनी केली आहे.याबाबत गटविकास अधिकारी यांना विचारले असतां त्यांनी आपणही मोंढे यांचा षोध घेत असल्याचे सांगीतले.