चंद्रपूर/प्रतिनिधी:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या "मन की बात" मधून चंद्रपूरच्या स्वच्छता मोहिमेचा उल्लेख केला होता. मात्र चंद्रपूर महानगरपालिकेला इको- प्रोचा विसर पडल्याचे दिसून आले. स्वच्छतेच्या कार्यात स्वतःला व सवंगड्यांना झोकून काम करायला लावणाऱ्या बंडू धोत्रेबंडू धोत्रे यांची स्वच्छता दूत म्हणून निवड होईल, अशी अपेक्षा होती. पण तसे न झाल्याने जिल्ह्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. जिल्ह्यात 270 दिवसांहून अधिक दिवस स्वच्छतेसाठी रात्रंदिवस एक करणाऱ्या बंडू धोत्रे च्या नावाची मागणी विविध स्तरातून करण्यात येत आहे.

शनिवारी इकोप्रोच्या सदस्यानचा सत्कार समारंभाचे आयोजन
यांच्या कार्याची दखल घेत शिवसेना विधानसभा जनसंपर्क कार्यालय जैनभवन पठानपुरारोड चंद्रपूर येथे सत्कार समारंभाचे आयोजन शनिवारी दुपारी 2 वाजता करण्यात आले आहे.या सत्कार समारंभाला जास्तीत जास्त संखेने उपस्थित राहावे,असे आव्हाहन करण्यात आले आहे