
रामटेक तालुका प्रतिनिधी-मनसर ते खवासा या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण होत असून काम प्रगतीपथावर आहे.मनसर येथे प्राथमीक आरोग्य केन्द्रासमोर या मार्गावर रस्ता ओलांडण्यासाठी कुठलीच तजवीज करण्यात
आलेली नाही त्यामुळे या भागातील नागरीकांना व प्रामुख्याने राष्ट्रीय आदर्श विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास होणार असल्याचा मुद्दा रामटेक पंचायत समीतीचे माजी उपसभापती व नागपुर जिल्हा ग्रामीण कॉंगेस कमेटीचे
महासचिव उदयसिंग यादव यांनी आमदार सुनिल केदार यांना याबाबत निवेदन सादर केले होते.आमदार केदार यांनी या महत्वाच्या समस्येकडे तात्काळ लक्ष देवून संबधितांची बैठक लावली.

तातडीने ही बैठक लावण्यात आली व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयापासून समोर आरोग्य केन्द्रापर्यंत रस्ता पावसाळयात बुडतो याबाबत व्यवस्था करावी,मनसर चौक ते मनसर गावातील सर्वेक्षणात सुटलेले तसेच विटभट्टा वस्तीतील रस्ता धकामामुळे बाधीत नागरीकांना त्यांचे घराचा मोबदला मीळण्याबाबत,रस्ता ओलांडण्यासाठी लोकांना व विद्यार्थ्यांना भुयारी मार्ग आवष्यक असल्याने त्याची व्यवस्थ करावी व रस्ता बांधकाम अधिग्रहणात सर्वेक्षणात सुटलेल्या लोकांना त्यांची जागा व ईमला बांधकामाचा पुर्ण मोबदला देण्यासंबधात कार्यवाही करावी अषी सुचना आमदार केदार यांनी यावेळी केली संबधित विभाग व कंपनीच्या अधिकारी यांनी यांनी तात्काळ या मागझया मान्य केल्या व लगेच सर्वेक्षण करण्याचेही आश्वासन दिले.सदर बैठकीत उदयसिंग यादव,महसूल विभागाचे नायब तहसिलदार विजयकुमार चौबे, राष्ट्रीय महामाग् प्राधिकरणचे श्री रमेश ,ओरिएंटल कंपनीचे सोमदत्त षर्मा,ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी सुरेश कोडापे,साबीर कादरी,देवेंद्र राउत,संतोश बोरीकर,कंचन धनोरे,सिमा गजबे,मोहन भगत,आशिष कळंबे,योगेष गोस्वामी,राजकुमार गुप्ता,अन्नु कादरी,अवनेषसिंग बिसेन,रोहीत ताटी,सचिन खागर,आषोक बांगरे,भुषण कडुकर व मनसर येथिल अनेक नागरीक उपस्थित होते.