चंद्रपूर
दि.29-
युवा
कार्यक्रम व क्रिडा मंत्रालय
भारत सरकार व्दारा संचालीत
नेहरु युवा केंद्र चंद्रपूरचे
वतीने वरोरा येथील युथ अवेअरनेस
ॲन्ड रुरल डेव्हलपमेंट (यार्ड)
या
संस्थेला युवा दिनानिमित्त
जिल्हा युवा पुरस्कार प्रदान
करण्यात आला.
संस्थेच्या
वतीने अध्यक्ष अरुण चौधरी
यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
या
संस्थेने शासन व युनिसेफ
यासारख्या संस्थांचे मदतीने
आरोग्य,
शिक्षण,
पाणी,
स्वच्छता,
माता-बालसंगोपन,
एडस
जागृती,
कुष्ठरोग
दुरीकरण,
रोहयो,
शेती
विकास यासारखे उपक्रम जिल्हयातील
वेगवेगळया भागात राबविले.
संस्थेने
कार्यक्षेत्रात युवा व किशोरी,
महिला,
शेतकरी
इत्यादीचे संघटन करुन ग्राम
विकासाला चालना दिली आहे.
गुडीया
मॉडेल,
ग्राम
विकास दल,
विधवा
महिलांचे संघटन यासारखे
नाविन्यपुर्ण उपक्रम राबविले
आहे.
नेहरु
युवा केंद्र चंद्रपूरचे वतीने
12
जानेवारी
2013
रोजी
विशेष समारंभात यार्ड ला
जिल्हा युवा मंडळ पुरस्काराने
सन्मानीत करण्यात आले.
कार्यक्रमाचे
अध्यक्ष साहित्यीक ना.गो.थुटे,
उदघाटक
समाजसेवक डॉ.विकास
आमटे यांचे हस्ते झाले.
त्यावेळी
प्रामुख्याने वृक्षमित्र
मोहन हिराबाई हिरालाल,
राज्य
पुरस्कार प्राप्त शिक्षक
प्रभाकर माटे,
जिल्हा
युवा समन्वयक जमुना डंगावकर,
डॉ.प्रमोद
गंपावार,
युनिसेफ
सल्लागार उपेंद्र पिल्लई
इत्यादी उपस्थित होते.
सुत्र
संचालन हर्षवर्धन डांगे यांनी
केले.