সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, January 20, 2013

क्रांतिभूमिचा विकास पारतंत्र्यात


भारतीय स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारी जाज्वल्य इतिहासाची साक्ष व अलौकिक कामगिरीची मुहूर्तमेढ रोवून स्वातंत्र्याचा प्रथम उपभोग घेणारे चिमूर शहर. भारतमातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी निधड्या छातीवर गोळ्या झेलणारा १६ वर्षीय शहीद बालाजी रायपूरकरची शहीदभूमी. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, आचार्य भन्साळी, विनोबा भावे आदी थोर महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानातून नवपिढीला प्रेरणा देणारे स्वातंत्र्याचे स्ङ्कुqल्लग पेटविणाèया चिमूर क्रांतिभूमीत अनेक मान्यवर, अनेक अधिकारी व पदाधिकारी होऊन गेलेत. पंतप्रधान व राष्ट्रपती यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. मात्र, विकासकामे पूर्ण झालेली नाहीत.
१९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यापासून ते आजतागायत या भूमीची उपेक्षाच झाली आहे.

तलावाचे अस्तित्व धोक्यात                          
शहराच्या उत्तर भागाला श्रीहरी बालाजी देवस्थान संस्थानाच्या मालकीच्या ७५ एकर जागेत पुरातन तलाव आहे. त्यातील ४० एकर जागा क्रीडासंकुलाकरिता जिल्हा प्रशासनाने अधिग्रहण करून त्यावर स्टेडिअम, न्यायालयीन इमारत, अनुसूचित जाती निवासी शाळा आदी बांधकाम केले. हे बांधकाम तलावाच्या पाणी येण्याच्या भागाकडून झाले आहे. चिमूर शहरातील पाण्याची पातळी नेहमीच वर राहात होती. परंतु, आता वाढते अतिक्रमण व इमारत बांधकामामुळे तलावाचे अस्तित्व नष्ट होत आहे. सध्या पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली आहे.
तलावाजवळून वरोरा-चिमूर हा महामार्ग जातो. तलावात प्लास्टिक पिशव्या, जोडे, चप्पल, टायरट्यूब व गावातील घनकचरा टाकण्यात येत असल्याने तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्याकडे ग्रामपंचायतीचे लक्ष नाही. या तलावात गावातील लोक कपडे धुणे व मच्छीमारी आदी कामे करायचे. पण, आता पाणीच नसल्याने तेसुद्धा बंद झाले आहे.
                          
क्रीडासंकुल अपूर्णावस्थेत
चिमूर येथे वीर स्वातंत्र्यसंग्राम सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. भारताचे तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरqसहराव यांनी चिमूर येथे राष्ट्रीय क्रीडासंकुलाची घोषणा करून ५० लाखांचा धनादेश जिल्हाधिकाèयांना दिला. त्यानंतर पाच ते सहा वर्षांनी येथे तत्कालीन राष्ट्रपती शंकरदयाल शर्मा यांनी स्वातंत्र्यसंग्राम सैनिकांच्या गौरव समारंभानंतर क्रीडासंकुलाचे भूमिपूजन केले. आज हे दोन्ही महामहिम हयात नाहीत. मात्र, १९९४ पासून क्रीडासंकुलाच्या बांधकामाचा दगड पुढे सरकलेला नाही. आतापर्यंत बांधकामासाठी दोन कोटींचा खर्च झाला. बॅडqमटन हॉल, व्ही. आय. पी. पॅव्हेलियन, मैदानाचे सौंदर्यीकरण व नाली गटार बांधकाम, प्रेक्षक गॅलरी आदी कामे पूर्ण झालीत. मात्र, उर्वरित कामे अपूर्णावस्थेत आहेत. अनेक साहित्य व सामानांची मोडतोड व चोरी होत आहे. यांच्या देखभालीकरिता कोणतीही व्यवस्था येथे नाही. हे क्रीडासंकुल जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या अखत्यारित येते. परंतु, एकही जबाबदार कर्मचारी या क्रीडासंकुलाकडे लक्ष देत नाही.
                          
चिमूर आगारात भंगार गाड्या
एस. टी. बससेवा ही ग्रामीण भागासह चिमूर शहरातील नागरिकांसाठी दळणवळणाची महत्त्वाची सोय आहे. चिमूर आगारात मागील काही वर्षांपासून आगार व्यवस्थापकांच्या दुर्लक्षामुळे बसस्थानकाची दुरवस्था होत आहे. बसस्थानकात वीजदिव्यांची व्यवस्था, पंखे, दूरचित्रवाणी व रंगरंगोटी नाही. एसटी चालक-वाहकांच्या मेहनतीने व नागरिकांच्या सहकार्याने चिमूर आगार नफ्यात आघाडीवर आहे. परंतु, नागरिकांच्या सुरक्षित परिवहनाची हमी घेणाèया बसगाड्या भंगार अवस्थेत आहेत. अनेक ठिकाणी बसगाड्यांच्या तुटक्या ङ्कुटक्या गाड्यांत प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. परंतु, एसटीचे वरिष्ठ अधिकारी व आगार व्यवस्थापकाच्या दुर्लक्षामुळे आगाराच्या दोन्ही मुख्य द्वारावर अतिक्रमण वाढले आहे. याकडे दुर्लक्ष होत असले, तरी प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे जीव मुठीत घेऊन बसस्थानकात प्रवेश करावा लागतो. अनेक विद्यार्थी आपली शाळा संपल्यानंतर बसची तासन्तास वाट पाहात असतात. मात्र, त्यांना उशिरापर्यंत स्वतःच्या गावाकडे जाण्यासाठी बससेवा उपलब्ध होत नाही.
                          
अतिक्रमणाचा विळखा
चिमूर शहरातील अतिक्रमणात दिवसेंदिवस वाढ झाली आहे. वरोरा-चिमूर-कान्पा मार्गावरून दोन मोठी वाहने जाण्याइतका रस्ता असूनही मोठी वाहने नीट जाऊ शकत नाहीत. तसेच चिमुरातील मुख्य बाजारपेठेत पायदळ ये-जा करणाèया नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. मासळ चौक ते नवीन बसस्थानकाकडे जाणाèया मुख्य रस्त्यावर मोठमोठी व्यापारी दुकाने लागल्याने पार्किंगसाठी जागा नाही. दुचाकी वाहनचालक आपली वाहने रस्त्यावरच उभी ठेवतात. त्यामुळे मोठे वाहन जाण्यास अडचण निर्माण होत आहे. चिमूर शहरातील मुख्य बाजार मार्केट मार्गावर बड्या व्यावसायिकांनी अतिक्रमण करून रस्ता गिळंकृत केला आहे. चिमुरातील जवळपास सर्वच मुख्य मार्गावर अतिक्रमण करून रस्त्यावर दुकाने थाटल्याने कधी- कधी रिक्षासुद्धा जाणे कठीण होत आहे.
                          
उच्चशिक्षणाची सोय नाही
चिमूर हे विधानसभा आणि लोकसभेचे क्षेत्र असले, तरी येथे उच्चशिक्षणाची कोणतीही सोय नाही. तालुक्यातील विद्याथ्र्यांना उच्चशिक्षणासाठी बाहेर जावे लागते. येथे आठवले समाजकार्य महाविद्यालय, राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय, ग्रामगीता महाविद्यालय, चिमूर सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स कॉलेज, आय. टी. आय. आहे. मात्र, अभियांत्रिकी, वैद्यकीय पदविका, कृषी पदविका आदी अभ्यासक्रमांचे शिक्षण नाही.
                          
आरोग्यसेवेचा खेळखंडोबा
ग्रामीण रुग्णालयात अनेक वर्षांपासून प्रभारी वैद्यकीय अधीक्षक व दोन वैद्यकीय अधिकारी आहेत. मात्र, नर्स, वॉर्डबॉय, डॉक्टर यासह अनेक पदे रिक्त असल्याने गरीब रुग्णांना वेळेवर उपचार व औषध मिळत नाही. औषधांचा अपुरा पुरवठा, अस्वच्छता, घाणीचे साम्राज्य असून, निवाèयाची व्यवस्था नाही. प्रभारी अधिकाèयाकडे अनेक वर्षांपासून प्रभार असल्याने ग्रामीण रुग्णालयाचे बेहाल झाले आहे. रुग्णालयाच्या परिसरातच १०० पलंगांचे श्रेणीवर्धक करून उपजिल्हा रुग्णालय इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने भविष्यात येथे चांगल्या आरोग्यसेवा उपलब्ध होतील. मात्र, वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचाèयांची पदे भरण्याची गरज आहे. येथील रुग्णांना नागपूर, ब्रह्मपुरी, वर्धा, चंद्रपूर येथे उपचार करावा लागतो. येथील ग्रामीण रुग्णालयात नेहमीच औषधांचा तुटवडा, रुग्णांना तपासणारी यंत्रे, एक्स- रे मशीन नेहमीच बंदावस्थेत असतात. त्यामुळे रुग्णांना मोठ्या रुग्णालयात रेङ्कर करावे लागते.
                          
रस्त्यांवर खड्डे
शहरातील वरोरा-चिमूर-कान्पा मुख्य मार्ग उखडलेला असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पावसाळ्यात खड्ड्यांत पाणी साचल्यामुळे डबक्याचे स्वरूप येते. नेहरू चौकात पावसाळ्यात पाणी साचलेले दिसून येते. मासळ चौक ते नवीन बसस्थानक मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांची गैरसोय होते.
                          
आठवडी बाजार रस्त्यावर
चिमूर ग्रामपंचायतीचा आठवडी बाजार वरोरा-चिमूर-कान्पा या महामार्गावरच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर भरतो. मात्र, भाजी, ङ्कळविक्रेते, जनरल, हॉटेल, स्टील भांडे व इतर दुकाने, रेडिमेड, मनेरिया, चहाटपरी, पानठेले इत्यादी दुकाने रस्त्यावरच थाटली जातात. त्यामुळे महामार्गावरून धावणारे एसटी, ट्रक, ट्रॅक्स कमांडर आदी वाहनांची गैरसोय होते. तलावाजवळील पाच एकर जागा बाजारासाठी नियोजित केली असली, तरी तेथे बाजार सुरू करण्यासाठी कोणतीही सुविधा करण्यात आलेली नाही.
                          
घाणीचे साम्राज्य
येथे भरत असलेल्या शुक्रवारी आठवडी बाजारातील भाजीपाला, केरकचरा व इतर टाकाऊ वस्तू रस्त्यावरच टाकण्यात येतात. त्यामुळे कुजून-सडून त्यापासून सुटणारी दुर्गंधी ये-जा करणाèया नागरिकांना सहन करावी लागते. चावडीवर गावातील घनकचरा, कापलेले केस, घरातील कचरा तसेच इतर खराब झालेले साहित्य टाकण्यात येते. त्याचाही ङ्कटका नागरिकांना बसत आहे. चिमूर ग्रामपंचायतीने मागील काही दिवसांपासून नाल्यांचा उपसा न केल्याने त्यापासून दुर्गंधी सुटत आहे.
                           
महागणदारीयुक्तङ्क शहर
महाराष्ट्र शासनाकडून हागणदारीमुक्त गाव संकल्पना लाखो रुपये खर्च करून राबविण्यात आली. मात्र, चिमूर शहरात ही योजना ङ्कोल ठरली आहे. सार्वजनिक शौचालय आहे. मात्र, ग्रामपंचायत प्रशासन देखभाल करीत नसल्याने शौचालयाची दुरवस्था झाली आहे. परिणामी नागरिकांना उघड्यावरच शौचास जावे लागते. शहरातील चावडी, क्रीडासंकुलावर दुतङ्र्का घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच स्वातंत्र्यलढ्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांची आठवण म्हणून मुख्य मार्गावर उभारण्यात आलेल्या हुतात्मा स्मारकावरही घाण केली जात आहे.
                          
चिमूर रेल्वेसेवेपासून वंचित
चिमूरपासून अवघ्या ५० किमी अंतरावर म्हणजे वरोरा व नागभीड येथे रेल्वेसेवा आहे. मात्र, चिमूर हे इतिहासकालीन शहर असूनही रेल्वेसेवा उपलब्ध नाही. चिमूर तालुक्यात मुरपार येथे वेकोलिची कोळसा खाण असून, तत्कालीन खासदार विलास मुत्तेमवार यांच्या पुढाकाराने त्यावेळी वरोरा-चिमूर-उमरेड व वरोरा-चिमूर-कान्पा-नागभीड या दोन्ही भागाकडील रेल्वेच्या लाइनसंदर्भात सर्वे करण्यात आला होता. परंतु, आज १५ ते २० वर्षे लोटूनही रेल्वेमार्गाविषयी कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत.
                           
चिमूरकर एटीएम सुविधेपासून वंचित
चिमूर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे मोठी मुख्य बाजारपेठ आहे. चिमूर शहरात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध झाली. परंतु, येथे मर्यादित खातेदारांचे व्यवहार आहेत. चिमुरात बँक ऑङ्क महाराष्ट्र, स्टेट बँक ऑङ्क इंडिया या दोन राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखा असूनसुद्धा या बँकेद्वारे अद्यापही एटीएम सुविधा उपलब्ध झाली नाही. त्यामुळे येथील व्यवहार करणाèया ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पैसे काढण्याकरिता गेलेल्या ग्राहकांना रांगेत तासन्तास ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे चिमूरकर एटीएमच्या प्रतीक्षेत आहेत.
                          
मोकाट जनावरांचा हैदोस
येथे ठिकठिकाणी मोकाट जनावरे मुक्तसंचार करताना दिसतात. मोकाट जनावरे व डुकरे वाहतुकीस अडसर बनत असल्याने अपघात व रोगराई होत आहे. येथील वरोरा-चिमूर-कान्पा या मुख्य मार्गावर अनेकांना प्राण गमवावा लागला आहे.
                           
रस्त्यावरच मांसविक्री
आठवडी बाजाराच्या दिवशी मटण मार्केट ऐन महामार्गावरच भरतो. हे विक्रेते टाकाऊ पदार्थ रस्त्यावरच ङ्केकतात. त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना नाकावर रुमाल घेऊन जावे लागत आहे. त्यामुळे आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
                           
अवैध वाहतूक
पोलिसांच्या दुर्लक्षित धोरणामुळे अवैध वाहतूक ङ्कोङ्कावत असल्याचे चित्र पहावयास मिळते. नवीन बसस्थानक, जुना बसस्थानक, चावडी चौक, qपपळनेरी चौकातही अनेक ट्रॅक्स, कमांडर, जीप, ऑटो अवैधरीत्या प्रवाशांची वाहतूक करीत असल्याने अपघातात वाढ होत आहे. याकडे स्थानिक पोलिस प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्यास अनेक मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागू शकते. यापूर्वीही अवैध वाहतुकीने अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत. चिमूर शहरात सद्य:स्थितीत मोठमोठे अपघात होऊन अनेक कुटुंबांतील व्यक्तींना आपले जीव गमवावे लागले.
                           
दारूविक्रीला उधाण
चिमूर हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील प्रथम स्वातंत्र्य मिळविणारे गाव असले, तरी येथे दारूविक्रीला उधाण आले आहे. १५ हजार २७१ लोकसंख्या असलेल्या ७३ टक्के साक्षर गावात दारूची आठ दुकाने आहेत. अनेक ठिकाणी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था नाही. गल्लीबोळात अवैधरीत्या मिळणारी देशी, गावठी मोहाची दारू, गल्लोगल्ली परवानाधारकांप्रमाणे लावलेली दुकाने तसेच मनोरंजन क्लबच्या नावावर प्ले गेम, व्हिडिओ गेम, तीन पानी यासारखा जुगार येथे चालतो.
चिमूर शहरात सरकारी परवानाप्राप्त देशी दारूचे एकही अधिकृत दुकान नसले, तरी शहरातील वाल्मीक चौक, आंबेडकर चौक, चावडी मोहल्ला, जुना बसस्थानक, नवीन बसस्थानक परिसरात अवैधरीत्या खुलेआम देशी दारूविक्री होत आहे. केसलापूर, कवडशी येथील परिसरात गावठी मोहाची दारू खुलेआम विकली जाते. अनेक मद्यपी रस्ते, गल्लीत पडून राहतात. शहरातील अनेक भागांत दारू सहज उपलब्ध होत आहे. यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. गरीब कुटुंबातील महिलांसह शाळकरी मुलेही या विळख्यात सापडली आहेत. शहरात नेरी, भिसी, खडसंगी येथून अवैधरीत्या दारूचा पुरवठा होत आहे.
                           
पिण्याच्या पाण्याची समस्या
चिमूर शहरात पाण्याच्या तीन टाक्या आहेत. एक टाकी मोडकळीस आली असून, पाणीपुरवठा विभागाने निरलेखनाचा कारवाई अहवाल ग्रामपंचायतीला सादर केला. एक नवीन टाकी निर्माणाधीन आहे. चारगाव धरणापासून पाणी आणून चिमूरकरांची तहान भागविण्यासाठी नऊ कोटी रुपयांची योजना गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सुरू आहे. मात्र, अद्यापही पाइपलाइन व टाकीचे काम पूर्ण झालेले नाही. जुन्या तीन टाक्यांपैकी हजारी मोहल्ला परिसरातील टाकी सदोष पाइनलाइनमुळे निकामी झाली आहे. नागरिकांना थेट पंपाद्वारे पाणीपुरवठा सुरू असल्याने त्या पाण्यात ब्लिqचग व स्वच्छतेची शाश्वती नाही. इंदिरानगर ठक्कर वॉर्ड, नेहरू वॉर्ड, गुरुदेव वॉर्ड यासह अनेक भागांत आजही पाणी व्यवस्थित नाही. गेल्या दहा ते बारा वर्षांपासून संपूर्ण चिमूरला एकच वेळा पाणी देण्यात येत आहे. अनेक भागात नळाद्वारे पाणी येऊ शकत नसल्याने जिथे मुबलक पाणी आहे, त्यांच्या घरून महिनेवारी पद्धतीने पाणी विकत घ्यावे लागते.
                          
शहीद हुतात्मा स्मारकाकडे दुर्लक्ष
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मोलाची भूमिका बजावणारे चिमूर शहर म्हणून इतिहासात नोंद आहे. मात्र, येथील शासकीय हुतात्मा स्मारक दुरवस्थेत आहे. विद्युतव्यवस्था नसल्याने रात्रीला अंधार असतो. रंगरंगोटी नाही, बागबगीचा नाही. हुतात्मा स्मारकाची देखरेख एका खासगी संस्थेला देण्यात आली असून, स्मारक परिसरात लग्नसोहळे, मेळावे, कार्यक्रम घेतले जातात.
                           

स्वातंत्र्यसंग्राम सैनिक कुटुंबांकडे दुर्लक्ष
भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अहोरात्र मेहनत करणाèया शहीद स्वातंत्र्यसंग्राम सैनिकांच्या कुटुंबांकडे दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे स्वातंत्र्यसंग्राम सैनिकांची कुटुंबे व्यथित जीवन जगत आहेत. त्यांच्या वारसांना शासकीय नोकरीत सामावून घेण्याची गरज आहे. मात्र, प्रशासनाने पाठ ङ्किरविल्याचे चित्र आहे.
                           
आमदारसाहेब चिमूरकरांच्या समस्येकडे लक्ष द्या...
राज्याचे माजी राज्यमंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांना मध्यंतरीच्या काळात लाल दिवा मिळाला. अत्यंत महत्त्वाचे जलसंपदा खाते प्राप्त झाले. परंतु, लाल दिव्याचा प्रकाश अद्याप चिमुरात पडलेला नाही. चिमूर ग्रामपंचायतीची सत्ता त्यांच्याकडेच आहे. येथे अनेक मोठे उद्योगधंदे उपलब्ध करून सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत. चिमूर येथील मितेश भांगडिया हे विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले. पण, शहराच्या विकासासाठी आतापर्यंत कोणताही निधी दिलेला नाही. दोन आमदार, एक खासदार असूनही चिमूर नगर परिषद, तसेच चिमूर जिल्हा होऊ शकले नाही. qसचन सुविधा, पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा, शैक्षणिक  क्रीडा सुविधा, सामाजिक व सांस्कृतिक विकासाची गरज आहे.

खासदारांना पाहिलंत का?
गडचिरोली-चिमूर हे लोकसभा क्षेत्राचे खासदार मारोतराव कोवासे आहेत. मात्र, चिमूरच्या जनतेला त्यांना पाहण्याचा योग आलेला नाही. २००९ मध्ये ते निवडून गेले. मात्र, आजवर त्यांचे कधीच दर्शन झाले नाही.
                           
चिमूर शहर दृष्टिक्षेप :-
ग्रामपंचायत स्थापना १९४२
लोकसंख्या १५२७१
स्त्री ७३९०
पुरुष ७८८१
वॉर्डाची संख्या ६
सदस्यसंख्या १७
पोलिस ठाणे १
ग्रामीण रुग्णालय १
महाविद्यालये ४
साक्षरता प्रमाण ७३%
हुतात्मा स्मारक १
शहीद स्मारक १
ग्रामपंचायत वाचनालय १
आठवडी बाजार-शुक्रवार
स्वातंत्र्यसंग्राम सैनिक २३
बसस्थानक १
पाळणाघर १

यांना समस्या सांगा :-
खासदार मारोतराव कोवासे ९४२२१५०७७२
आमदार मितेश भांगडिया ९४२२११०२३५
आमदार विजयभाऊ वडेट्टीवार ९६६५६९९९९९
प्रभारी सरपंच बाळकृष्ण ग. बोभाटे ९४२१७२०७६१
प्रभारी ग्रामविकास अधिकारी पी. डब्ल्यू. अल्लीवार ९४२०११२१४१
प्रभारी संवर्ग विकास अधिकारी लता साळवे ९८२२७१३७६८
तहसीलदार नीलेश काळे ९४२३६८७९१५
पोलिस निरीक्षक पंजाबराव मडावी ९४२१७१९४८८
पंचायत समिती सभापती विनोद चोखरे ९९२११६७०७२
उपसभापती अरुणाताई नन्नावरे ९७६३८९३७८७

माहिती संकलन :-गणपतराव खोबरे, तालुका बातमीदार, चिमूर, मो. ९४२१७२०७७४
 सुभाष शेषकर, शहर बातमीदार, चिमूर, मो. ९४२१७२०७५०

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.