वर्धा: ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि गांधीवादी नेते ठाकूरदास बंग यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. वर्ध्यातील चेतनविकास या त्यांच्या फार्महाऊसमध्ये बंग यांनी अखेरचा श्वास घेतला. ठाकूरदास बंग ९५ वर्षांचे होते.
ठाकूरदास बंग यांचा अलिकडचा परिचय म्हणजे ज्येष्ठ समाजसेवक अभय बंग यांचे ते वडील होते. बंग यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी चार वाजता राहत्या घरीच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
ठाकूरदास बंग यांचा जन्म अमरावतीमध्ये झाला होता. भारत छोडो, खादी आणि सर्वोदय चळवळीत ठाकूरदास बंग यांचा मोठा सहभाग होता.
स्वातंत्र्य चळवळीतील बंग यांच्या योगदानासाठी १९९२मध्ये त्यांना माजी राष्ट्रपती के.शंकरनारायणन यांच्या हस्ते जमनालाल बजाज पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्याचबरोबर प्रतिष्ठित नाग भूषण या पुरस्कारानेही त्यांचा २०१२मध्ये गौरव करण्यात आला होता.