चंद्रपूर, जिल्ह्यात दारुबंदीसाठी अॅड. पारोमिता
गोस्वामी यांचे नेतृत्वात शेकडो कार्यकत्र्यांनी जेल सत्याग्रह करीत अटक करवून घेतली.
अॅड. गोस्वामी व त्यांचेसह १७७ महिला पुरुषांनी जामीन नाकारल्याने नागपूर कारागृहात
रवानगी करण्यात आली. १२ डिसेंबर २०१२ रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक महिन्यात
चंद्रपूर जिल्हा दारुबंदीबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र याबाबत शासनाने
आपले वचन न पाळल्याने ता. १३ जानेवारी २०१३ रोजी सत्याग्रहाची शपथ घेत प्रजासत्ताक
दिनाचे दिवशी जेल सत्याग्रह जाहीर करण्यात आले. त्यानुसार आज जिल्हा भरातून हजारो महिला
पुरुष जेल सत्याग्रहांसाठी उपस्थित झाले. ता. २६ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजता शासकीय
ध्वजारोहणासाठी जात असतांना पोलिसांनी सावरकर चौकातच पोलिसांनी अटकाव केला व सत्याग्रहींना
धरपकड सुरु केली. या धरपकडीत व ओढातान झाल्याने २५ ते ३० महिलांना किरकोळ इजा झाली
काही महिलांच्यासाड्या ङ्काटल्यात पोलिसांनी अटक करून सोडण्यासाठी प्रयत्न केले. मात्र
सत्याग्रहींनी जेलचिच मागणी केली. जामीन नाकारले त्यामुळे पोलिसांनी २७२ सत्याग्रहींना
अटक करण्यात आली. त्यात पुरूष व १९२ महिला आहेत, यातील ९५ महिलांना जामीन दिल्याने
उर्वरित १७७ सत्याग्रहीना जेलमध्ये टाकण्यात आले. महिला सत्याग्रहींना नागपूर कारागृहात
तर पुरुष सत्याग्रहींना चंद्रपूर कारागृहात ठेवण्यात आले. शासनाच्या विवेक बुद्धीला
आवाहन करण्याच्या हेतुने हे आंदोलन करण्यात आले. सत्याग्रहींनी जामीन घ्यावा यासाठी
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गृहमंत्री आर. आर.पाटील, यांनी प्रयत्न केले. पृथ्वीराज चव्हाण
यांनी जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांचे माङ्र्कतीने सत्याग्रहीचे मन वळविण्याचा प्रयत्न
केला. मात्र अॅड. गोस्वामी यांनी जामीन घेण्यास इन्कार केला. आदोलनाला जेष्ठ सामाजीक
कार्यकत्र्यां डॉ. राणी बंग यानी भेट दिली. चंद्रपूर येथील सामाजीक कार्यकर्ते जयश्री
कापसे, डॉ.
गोपाल मुंधडा, पप्पु देशमुख, प्रा. सुरेश चोपणे, डॉ. योगेश्वर दुधपचारे, आदींनी पालक मंत्री संजय देवतळे यांची
भेट घेऊन सत्याग्रहींच्या आंदोलनावर भूमिका घेण्याची विनंती केली. आज जामीन दिलेल्या
९५ महिलांनी घरी जाण्यास नकार देऊन पोलिस स्टेशन मध्येच ठाण मांडून कारागृहात ठेवण्याची
मागणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रहींना पाठींबा देण्यासाठी धरणे आंदोलन
सुरु करण्यात आले.,
Sunday, January 27, 2013
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য