दुकाने जाळली ...लाखोंचे नुकसान
गोंडपिपरी:- ग्रामपंचायतीलगत असलेल्या दुकानांना आज पहाटेच्या सुमारास आग लागली. दोन दुकाने जळून खाक झालीत.आगीत पाच लाख रूपयांचा माल जळाला.हि आग लागली नसून लावण्यात आल्यांचे दुकानदारंानी म्हटले आहे. आगीने कर्ज घेउन दुकान थाटणा-या दुकानदारांवर मोठेच संकट ओढवले आहे.
गोंडपिपरी ग्रामपंचायत लगत संजय सातपुते यांचे कुषन वर्क चे दुकान आहे.गेल्या चार वर्षापासून ते हे दुकान चालवितात.आपल्या कुषन च्या व्यवसायाला जोड म्हणून त्यांनी पंधरा दिवसापूर्वी फर्निचर व आलमारी चा व्यवसायाला सुरवात केली. यासाठी बॅक आॅफ इंडिया गोंडपिंपरी व इतर बॅकातून त्यांनी दोन लाख रूपयाचे कर्ज घेतले.सोबतच मित्रमंडळीकडूनही एक लाखाची मदत घेेतली. इतर दुकानापेक्षा स्वस्त्यात माल विकत असल्याने अल्पावधीतच हे दुकान चालायला लागले.ग्रामपंचायतींच्या जागेवर हे दुकान आहे. यामुळे या दुकानात विघूत पुरवठा नव्हता. कुषनचे सामान आत तर फर्निचर व आलमारी चे साहित्य ते बाहेर ठेवीत होते. अषातच आज पहाटे च्या सुमारास त्यांना आपल्या दुकानातून धूराचा वास आला. काही कळायच्या आतच दुकानाला भिषन आग लागली. अषात सातपूते यांनी दुकानासमोरील षेजा-याला आवाज दिला. त्यांनी तातडीने या आगीला विजविण्यासाठी षर्थीचे प्रयत्न केले.यांनंतर सकाळच्या सुमारास अग्नीषामक दलाची गाडी दाखल झाली. त्यांनी उरलीसुरली आग विझविली. मात्र यात संजय सातपूते यांच्या दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले.लगतच्या पेंटर महेष दूर्गे याचेही दूकान पुर्णतःजळाले.तर जवळ असलेल्या संजय येरोजवार यांच्या सायकल दुकानालाही या आगीचा काहीसा फटका बसला.घटनेची माहिती पोलीसांना,तालुका प्रषासनाला देण्यात आली. घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.