সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, January 16, 2013

४०० विद्यार्थिनींना 'निर्भय'तेचे धडे

चंद्रपूर - दिल्लीतील सामूहिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर महिला व मुलींना स्वतःचे संरक्षण करतायेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले आहे या विचारांना प्रत्यक्षात आणण्यासाठी चंद्रपूरजिल्हा पोलिसांनी पुढाकार घेतला आहे त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थिनींनास्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी तीन दिवसीय मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिराचे आयोजनकरण्यात आले होते शहरातील विविध शाळा महाविद्यालयातील जवळपास ४००विद्यार्थिनींनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला 
दिल्लीत निर्भया वरील सामूहिक अत्याचाराने अवघा देश हादरला तिच्या जाण्यानेसारा देश एकवटला प्रत्येकाच्या मनातील निखारा पेटून कुठे मेणबत्ती तर कुठे मशालहोऊन तो प्रज्वलित झाला महिला मुलींना स्वाभिमानाने सन्मानाने निर्भयतेने जगतायेईल मोकळा श्वास घेता येईल अशी परिस्थिती निर्माण करणे गरजेचे मानले जाऊ लागलेत्यासाठी मुलींनीही मनगटात ताकद आणून स्वसंरक्षणार्थ धडे गिरविणे गरजेचे होते .असे झाल्यास यावर तसाच पायबंद बसू शकतो असे मत अनेकांनी व्यक्त केले यासाठीचचंद्रपूर जिल्हा पोलिसांनी पुढाकार घेतला पोलिस मुख्यालय येथे शनिवार तेसोमवारदरम्यान तीन दिवसीय मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिर पोलिस विभागाच्यावतीनेघेण्यात आले 

खाली माना टाकून समोर जाण्याची प्रथा बदलून ताठ मानेने व आत्मविश्वासानेजगण्याच्या दृष्टीने स्वसंरक्षणाची गरज या शिबिराच्या निमित्ताने समोर आली पोलिसउपनिरिक्षक राजू मांडवे निलेश करंदीकर पोलिस शिपाई प्रवीण रामटेके सोमू एंलचलवारयांनी मुलींना स्वसंरक्षणार्थ शारीरिक प्रशिक्षण दिले याचबरोबर पावर पाईंटसादरीकरणाद्वारे पीपीटी महिलाविषयक कायदे सायबर सिक्युरिटी सुरक्षित सोशलनेटवर्कींग या विषयांवर सायबर सेलचे पोलिस उपनिरिक्षक डॉ राहुल खटावकर व पोलिसउपनिरिक्षक प्रिती ताटे यांनी मार्गदर्शन केले सदर प्रशिक्षणाला महिला व आठव्यावर्गावरील मुलींसाठी होते तीन दिवस प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वाटपकरण्यात आले 

मुलींना स्वतःचे संरक्षण करता यावे यावर विचारमंथन व कृती सुरू झाली आहे याचकृतीचा एक भाग म्हणून जिल्हा पोलिसांच्यावतीने घेण्यात आलेले हे शिबिर महत्वपूर्णमानले जात आहे 

शिबिरांची नितांत गरज 
महिलांच्या स्वसंरक्षणासाठी अशा शिबिरांची अत्यंत आवश्यकता आहे असे मत उत्पादनशुल्क विभागाच्या उपायुक्त प्रिती जैन चौधरी यांनी व्यक्त केले 


सर्वप्रथम मुलींच्या संरक्षणाची जवाबदारी ही त्यांची स्वतःची आहे त्यासाठीच हे प्रशिक्षणशिबीर आयोजित करण्यात आले होते आगामी काळातही असे उपक्रम राबविले जातील राजीव जैन जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्रपू

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.