- रोहयो मंत्री डॉ. नितीन राऊत
चंद्रपूर
दि.24- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील सिंचन विहिरीचा
लक्षांक तात्काळ पूर्ण करा अशा सूचना रोजगार हमी
योजना व जलसंधारण मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले. आज जिल्हाधिकारी कार्यालयात रोहयो आढावा बैठक
घेण्यात आली त्याप्रसंगी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी विजय वाघमारे, उपवनसंरक्षक पी कल्याणकुमार, प्रकल्प संचालक
अंकुश केदार व उपजिल्हाधिकारी दामोधर नान्हे उपस्थित होते.
महात्मा गांधी
राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणा-या यंत्रणांच्या कामाचा आढावा या
बैठकीत घेण्यात आला. यात प्रामुख्याने
कृषी, जिल्हा परिषद सिंचन विभाग व वन विभाग यांचा समावेश होता. जिल्हयात वैयक्तीक शौचालयाचे काम चांगले
झाल्याचे सांगून मंत्री नितीन राऊत यांनी समाधान व्यक्त केले. मात्र सिंचन विहिरीच्या कामाबाबत बोलतांना
लक्षांक तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. वन विभागाला जास्त काम करण्याची संधी असून
त्यांनी जास्तीत जास्त कामे करावी असे ते म्हणाले.
रस्त्याच्या
खडीकरणाचे काम वाढविण्याची आवश्यकता व्यक्त करुन राऊत म्हणाले की, पांदन
रस्त्याच्या कामासाठी व गाळ काढण्यासाठी लातूर पॅटर्न चा अवलंब करावा तसेच बुलडाणा
जिल्हयात लोक सहभागातून रस्ते तयार करण्याचे काम अतिशय छान झाले असून त्याप्रमाणे
आपल्या जिल्हयातही करावे असे राऊत म्हणाले.
ज्या गावामध्ये
क्रीडांगण नसेल त्या गांवात क्रीडांगण उभारण्यासाठी सुध्दा हा निधी वापरता येईल
तसेच दहन घाट व दफन भुमी बांधकामासाठी निधी वापरण्यासंबंधी लवकरच परवानगी देण्यात
येईल असे सांगीतले. रोहयोच्या अंमलबजावणीसाठी
तालुका तसेच पंचायत समिती स्तरावर कार्यशाळा व चर्चासत्राचे आयोजन करावे असे
सांगून जास्तीत जास्त लोकांना रोहयोच्या कामात सहभागी करुन घेण्याच्या सूचना राऊत
यांनी दिल्या.
31 मार्च
तोंडावर असल्यामुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेच्या कुठल्याही
यंत्रणेचा निधी वापस जाता कामा नये असे निर्देश देतांना कामाची गुणवत्ता जोपासावी
असे ते म्हणाले. काम करतांना काही अडचणी असल्यास आपल्याला सांगा, त्या तात्काळ सोडवू मात्र यंत्रणानी लक्षांक
पूर्ण करण्यावर भर दयावा असेही नितीन राऊत म्हणाले.