चंद्रपूर - वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. मात्र, तिथे आज सर्वाधिक दारू विकली जाते. मग दारूबंदीचा उपयोग काय? संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदी करा. अशी मागणी दारूविक्रेत्यांनी शासनाला केली. जिल्ह्यात दारूबंदीचे आंदोलन जोरात असताना त्याला विरोध करण्यासाठी दारूविक्रेत्यांसह या व्यवसायावर अवलंबून असलेल्या हजारोंच्या गर्दीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आज (ता. 30)मोर्चा काढून आपल्या भावना शासनदरबारी मांडल्या. वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्याप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्यात यावी, या मागणीसाठी "श्रमिक एल्गार'ने डिसेंबर महिन्यात पदयात्रा काढली. त्यानंतर राज्य शासनाने सकारात्मक आणि नकारात्मक बाबींवर आढावा घेण्यासाठी दारूबंदी समिती स्थापन केली. त्यानंतर जिल्ह्यातील काही संघटनांनी संयुक्त कृती समिती स्थापन करून दारूबंदीची मागणी रेटून धरली आहे. दारूबंदीचे समर्थक एकत्र येत असताना दारूविक्रेत्यांनीही आपली ताकद मोर्चाच्या माध्यमातून दाखविली.
Wednesday, January 30, 2013
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য