भद्रावती/प्रतिनिधी :
गेल्या शुक्रवारी वेकोलि माजरीच्या तेलवासा खुल्या कोळसा खाणीत रात्री ११.३० वाजता कोळसाचा ढिगारा कोसळल्याने डोजर आॅपरेटर चा जागीच मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांनाच माजरी कुनाडा खुल्या कोळसा खाणीत आणखी आठवडा भरानंतर कोळशाचा ढिगारा अंगावर कोसळल्याने सहा कामगार जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. या ढिगाऱ्यात 8 वोल्वो टिप्पर, 2 ड्रिल मशीन, पीसी मशीन 4 व एक सर्व्हिसिंग गाडी दबली असल्याची माहिती मिळत आहे
सोबतच जवळपास ६ कामगार ढिगाऱ्या खाली अडकल्याची शक्यता आहे. शुक्रवारी मध्यरात्री १ च्या सुमारास जवळपास अर्धा किलोमीटर अंतराचा मातीचा ढिगारा कोसळला. या विस्तीर्ण ढिगाऱ्याखाली दबलेल्या अनेक कामगारांपैकी फक्त तिघांना बाहेर काढण्यात यश आले आहे. त्या तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना रात्रीच नागपूरला हलविण्यात आले.चार दिवसापूर्वीही तेलवासा खाणीत अशीच अशीच घटना घडली होती. यामध्येत तिथे काम करणारा डोजर आॅपरेटर निरजु झा (५५) हा दबून जागीच ठार झाला. या ठिकाणी काम करणारे दहा कामगार बचावले. यानंतर वेकोलिच्या सतर्क विभागाच्या अधिकाऱ्याना खाण बंद करण्याचे आदेश दिले होते व ती खान देखील बंद करण्यात आली होती