चंद्रपूर : व्यसनमुक्त, सुसंस्कृत समाज घडविण्याच्या उद्देशातून सुरू करण्यात आलेल्या समाजसुधारक फउंडेशनतफ देशभरात अभिनव उपक्रम सुरू आहे. याच उपक्रमातून नितीन पोहाणे यांच्या वाढदिवसानिमित्त २० मे रोजी चंद्रपूर येथे विविध क्षेत्रातील आदर्श व्यक्तींचा सत्कार होत आहे.
नितीन पोहाणे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई, दिल्ली, नागपूर, नासिक, नांदेड, हैदराबाद येथेही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक चांदा क्बल मैदानावर सर्व क्षेत्रातील समाजसुधारक आदर्श व्यक्तींचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांनी सुचविलेल्या व्यक्तींना आदर्श व्यक्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यात समाजसेवक, सीबीआय अधिकारी, पोलिस अधिकारी, वाहतूक शाखा,आरटीओ, एसआयडी, सीआयडी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, वकील, डॉक्टर, सरपंच, व्यापारी, उद्योजक,कामगार, वक्ते, विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य, मुख्याध्यापक, पुढारी, पत्रकार, पत्नी, पती, स्त्री, मुलगा, मुलगी, आई,वडील, आजोबा, आजी, ज्येष्ठ नागरिक, कर्मचारी, संस्था, मूर्तीकार, ऑटोचालक, साहित्यिक, अभियंता, खेळाडू,ग्रामपंचायत, नगरसेवक, नगराध्यक्ष, ज्येष्ठ ऑटोचालक आदींचा सत्कार केला जाईल. अशा आदर्श व्यक्ती आपल्या परिसरात असतील, तर नागरिकांनी स्वत: नावे कळवावीत, असे आवाहन नितीन पोहाणे यांनी केले आहे.
२० मे रोजी उत्कृष्ट ऑटो स्पर्धा आयोजित केली आहे. हा उपक्रम मागील वर्षीपासून सुरू असून, देशभरातील मुख्य शहरातही आयोजन करण्यात आले होते. उत्कृष्ठ ऑटो स्पर्धेद्वारे ऑटोचालकांना समाजसुधारणेत सहभागी करून घेणे, जे लोक व्यसनाधीन आहेत, त्यांच्याबद्दल अनेकजण वाईट बोलतात. मात्र, त्यांना सुधारण्याचा प्रयत्न होत नाही. अशांच्या सुधारणेसाठी आणि व्यसनमुक्त व्यक्ती बनविण्यासाठी समाजसुधारक न्यासतफ प्रयत्न केले जाणार आहेत.
आदर्श व्यक्तींचा सत्कार करताना सुसंस्कृत, सुसभ्य व सर्व नियमांचे पालन करणारे, मदतीस धावून येणारे,गरजूंना मदत करणाèया ऑटोचालकांचा सत्कार केला जाणार आहे. ऑटोचालकांना इंग्रजी भाषेचे ज्ञान अवगत व्हावे म्हणून इंग्रजीचे धडे दिले जात आहे.
नितीन पोहाणे यांच्या वाढदिवसानिमित्त २० मे रोजी सकाळी १० वाजता रक्तदान शिबिर होईल. यावेळी अशुद्ध रक्त टाळण्यासाठी मद्यसेवन तपासणी व रक्ततपासणी यंत्र ठेवण्यात येणार आहे. याशिवाय मोङ्कत रक्तगट तपासणी,विविध रोग निदान शिबिर आणि तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन केले जाईल. समाजातील लोकांना होणाèया अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी मोङ्कत वकील सेवा कायमस्वरुपी सुरू करण्यात येईल. बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी स्टॉल लावण्यात येणार असून, तरुणांनी आपल्या बायोडाटासह उपस्थित राहावे.कुपोषित बालकांसाठी पौष्टिक आहाराची व्यवस्था, ऑटोचालकांना कमी दरात इन्शुरन्स सुविधा, इतर समस्यांचे निराकरण करण्यासाठी २४ तास अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी समाज सुधारणा न्यासचे कार्यकर्ते वचनबद्ध राहतील, असे आवाहन नितीन पोहाणे यांनी सांगितले.
joddeul pathanpura chouk pathanpura ward, chandrapur.