সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, May 08, 2013

गोपानी आयर्न कंपनीत कामगाराचा अपघाती मृत्यू

चंद्रपूर, ८ मे
गोपानी इस्पात कंपनीत अपघात होऊन एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घयना बुधवार, ८ मे रोजी पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली. प्रकाश प्रभाकर तुराणकर (२३) असे मृतक कामगाराचे नाव आहे.
तब्बल ४ ते ५ तासानंतर अपघाताची वार्ता अन्य कामगार व मृतकाच्या कुटुंबियांना मिळाल्यानंतर त्यांनी सामान्य रुग्णालयात दाखल होऊन मृत कामगाराची ओळख सांगितली. यावेळी संतप्त कामगारांकडून मदतीची याचना होत असतानाच भारतीय जनता युवा मोर्चा व अन्य संघटनांच्या पदाधिकाèयांनी सामान्य रुग्णालयात धाव घेऊन मृतकाच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. कामगारांचा आक्रमक पवित्रा बघून काही वेळात कंपनीचे अधिकारी रुग्णालयात दाखल झाले. मात्र, त्यांना कामगारांच्या संतापाला सामोरे जावे लागले. मुलाचा मृत्यू हा अपघाती नसून, त्याची हत्या झाल्याचा आरोप मृतकाचे वडील प्रभाकर तुराणकर यांनी केला आहे.
घुग्घुस येथील रामनगर परिसरातील रहिवाशी प्रकाश प्रभाकर तुराणकर हा तरुण गोपानी इस्पात आयर्न कंपनीत हायवा गाडीवर चालक म्हणून काम करीत होता. नागपूर येथील सप्रा ट्रान्सपोर्ट कंपनीने गोपानीकडून मालाची ने-आण करण्याचे कंत्राट घेतले आहे. मात्र, प्रत्यक्षात हे काम सप्रा ट्रान्सपोर्ट करीत नसून, डीआरबी कंपनीच्या माध्यमातून केले जात आहे. बुधवारी, रात्री नेहमीप्रमाणे प्रकाश तुराणकर हे हायवा गाडी घेऊन कंपनीत दाखल झाले. गाडीत माल भरला जात असताना डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा पहाटे ४ वाजताच्या सुमारास घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेनंतर कंपनी व्यवस्थापनाकडून गुप्तता पाळण्यात आली. मृतकाच्या कुटुंबियांना कळविण्याची तसदीही त्यांनी घेतली नाही. काही वेळानंतर अन्य कर्मचाèयांच्या मदतीने मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात टाकून देऊन तेथून निघून गेले. मृतकाजवळ कुणीही नसल्याने तेथील पोलिस चौकीत लावारिस मृतदेह म्हणून नोंद करण्यात आली होती.
पहाटे घडलेली घटना सकाळी ७ वाजता मृतकाच्या कुटुंबियांना व अन्य कामगारांना माहीत होताच त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले. कंपनी व्यवस्थापनाकडून झालेल्या कृतीचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला. यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाचे चंद्रपूर महानगर उपाध्यक्ष स्वप्नील काशीकर व त्यांच्या सहकाèयांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनीही रुग्णालय गाठून मृतकाच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी खटाटोप सुरू केला. काही वेळानंतर अन्य संघटनांचे पदाधिकारी दाखल झाले. त्यानंतर सामान्य रुग्णालयात वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते व संतप्त कामगारांनी कंपनीच्या अधिकाèयांनी रुग्णालयात येऊन मृतकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी लावून धरल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
कामगारांचा रोष लक्षात घेऊन गोपानी कंपनीचे व्यवस्थापक दशरथqसग, डीआरबीचे गोरे यांनी रुग्णालय गाठून कामगारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, कंपनीकडून कोणतेच ठोस आश्वासन मिळत नसल्याने संतप्त कामगारांनी या दोन्ही अधिकाèयांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर गोपानीचे उपाध्यक्ष अमोल उद्धवजी यांनी येऊन मृतक कामगारांच्या कुटुंबियांना अंत्यसंस्कारासाठी २५ हजार रुपये तात्काळ आर्थिक मदत केली. तसेच ५ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर तणाव निवळला आणि मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. मात्र, कामगारांचा रोष लक्षात घेऊन शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शेखर qचचोळकर, दंगा नियंत्रण पथक रुग्णालय परिसरात तैनात होऊन परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते.
===========

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.