সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, May 05, 2013

राजगडचा पुत्र विदर्भाचा पहिला चित्रपट निर्माता


चित्रपटसृष्टीची शंभर वर्षे : नव्वदच्या दशकात रोवली मुर्हूतमेढ

देवनाथ गंडाटे : सकाळ वृत्तसेवा 
चंद्रपूर, ता. ३ : चित्रपट म्हटले की, ओठावर मुंबईचे नाव आणि डोळ्यासमोर दिसते ती मायानगरी. ही चित्रपटसृष्टी आज शंभरावा वाढदिवस साजरा करीत आहे. केवळ मुंबईकरांचेच अधिराज्य असलेल्या या चंदेरी दुनियेत नव्वदच्या दशकात राजगड येथील प्रकाश पाटील यांनीही पाऊल ठेवले होते. मराठीत गाजलेला मआमच्यासारखेच आम्हीफहा त्यांचा पहिला चित्रपट. २० लाखांत चित्रपट निर्मिती करून त्यांनी विदर्भातील पहिले निर्माता म्हणून रुपेरी पडद्यावर नाव कोरले.

प्रकाश पाटील मारकवार हे चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक राजकारणी म्हणून परिचित आहेत. आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या राजगडचे ते पुत्र. राजकारण आणि सहकार क्षेत्राशिवाय त्यांना कलेविषयी आपुलकी होती. झाडीपट्टीतील ग्रामीण कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी प्रसंगी आर्थिक मदतीचा हातही पुढे केला. १९९०च्या काळात त्यांना चित्रपट निर्मितीची ओढ निर्माण झाली. त्यांनी पैशाची जुळवाजुळव करून सचिन पिळगावकर दिग्दर्शित मआमच्यासारखे आम्हीचफहा चित्रपट तयार केला. त्याचा उद्घाटन सोहळा जॉकी श्राफयांच्या हस्ते झाला होता. चित्रपटात अशोक सराफ, सचिन पिळगावकर, वर्षा उसगावकर, निवेदिता सराफ, सुधीर जोशी, विशू जोशी यांनी काम केले. अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेली गाणी अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर, शैलेंद्र qसग यांनी गायिली होती. हा चित्रपट महाराष्ट्रातील सुमारे १३ सिनेमाघरांत एकाचवेळी प्रदर्शित झाला आणि मराठी प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतले होते. या चित्रपटाच्या यशानंतर त्यांनी अनेक वर्षे या क्षेत्राकडे पाय ठेवले नाही. ग्रामीण राजकारण आणि समाजकारणामुळे ते चित्रपट निर्मितीपासून दूर गेलेत. १९९२-९७ या काळात ते चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. त्यानंतर २००५ पर्यंतचा काळ त्यांनी राजकारणातच घालविला. २००५ मध्ये पुन्हा त्यांना सिनेमाचा ध्यास लागला. पीतांबर काळे दिग्दर्शित ममी तुळस तुझ्या अंगणीफया चित्रपटाची त्यांनी निर्मिती केली. त्यात ऐश्वर्या नारकर, अशोक qशदे, सुरेखा कुडची आणि प्रेमा किरण यांनी अभिनय केला. याही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि प्रकाश पाटलांनी निर्मितीला पुन्हा पूर्णविराम दिला. विदर्भात चित्रीकरणासाठी चांगली स्थळे असूनही तांत्रिक साधनाअभावी खर्च पेलत नव्हता. राजगडच्या निर्मात्याने मुंबईत जाऊन चित्रपट निर्मिती करणे, हे व्यावसायिकदृष्ट्या झेपत नव्हते. केवळ कलेची आवड म्हणून दोन चित्रपटांची निर्मिती केल्याचे प्रकाश पाटील मारकवार यांनी सकाळशी बोलताना सांगितले. मध्यंतरीच्या काळात मराठी चित्रपटांना हलाखीचे दिवस आले होते. आता राज्याच्या सांस्कृतिक खात्याने करमुक्तता दिल्याने चित्रपटनिर्मिती करणाèयांची संख्या वाढली आहे. अनेक वैदर्भीय कलावंतांनी येथे ठसा उमटविला आहे.


लक्ष्याशी होती जिवाभावाची मैत्री
मराठीतील एकेकाळचा विनोदाचा बादशाह लक्ष्या अनेकांच्या मनात आजही आहे. चित्रपट निर्माता म्हणून काम करताना प्रकाश पाटील यांची लक्ष्मीकांत बेर्डेशी जिवाभावाची मैत्री होती. जॉकी श्राफ आणि अशोक सराफ यांच्याशी जवळचे संबंध होते. अशोक सराफआणि वर्षा उसगावकर हे प्रकाश पाटील यांच्या राजगड येथील घरीसुद्धा येऊन गेलेत.
----------------------





२०१४ मध्ये विधानसभा निवडणुका आहेत. त्यातही नशीब आजमावयाचे आहे. राजकारणासोबत झाडीपट्टीतील कलावंतांना घेऊन पुढील वर्षी आणखी एक मराठी चित्रपट साकारू.
प्रकाश पाटील मारकवार 



শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.