बंडु धोतरे यांच्या पाठपुराव्यानंतर
पर्यावरण खात्याने घेतली दखल
उदयोग व खाणीमुळे चंद्रपूर शहरातील नागरिकांना प्रदुषणासह दरवर्षी उन्हाळयात वाढत्या तापमानाच्या सामना करावा लागतो. इतर शहराच्या तुलनेत चंद्रपूर शहरातील तापमान रात्री देखील कायम असते. दिवसभर उन तापल्यानंतर रात्री पारा कमी होण्यास प्रचंड वेळ लागतो. त्यामागील नेमकी व अभ्यासपुर्ण कारणे शोधुन कायमस्वरूपी तोडगा काढण्याकरिता ‘निरी’ कडुन संशोधन करण्याची मागणी इको-प्रो चे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी दोन वर्षापुर्वी तत्कालीन जिल्हाधीकारी प्रदिप काळभोर (15 मे 2010) यांचेकडे केली होती. त्यावर निरी संस्थेला पत्र पाठवुन मागणीच्या अनुषंगाने विनंती केली, त्याला प्रतिसाद देत निरीने अभ्यास करण्यासाठी होकार दिला (31 मे 2010). मात्र लागणाÚया खर्चाची तरदूत करण्याकरीता निधीचे स्त्रोत ठरविण्याबाबत लिहले होते. पंरतु, नंतरच्या काळात यावर पाठपुरावा न झाल्याने तापमानाचा अभ्यास प्रलंबीत होता.
पर्यावरण खात्याने घेतली दखल
चंद्रपूरः शहरात दरवर्षी उन्हाळयात होेत असलेली तापमानाच्या वाढीची कारणे शोधुन त्यावर उपाययोजना शोधण्यासाठी इको-प्रोचे अध्यक्ष तथा जिल्हा पर्यावरण समीतीचे सदस्य बंडु धोतरे यांनी गत दोन वर्षापासुन सतत पाठपुरावा केल्यानंतर नागपूरच्या राष्ट्रीय अभियांत्रीकी अनुसंधान संस्थान (निरी) तर्फे अभ्यास करण्याकरिता लागणारा खर्च याकरिता प्रयत्न करण्यााबाबत पर्यावरणमंत्री ना. संजय देवतळे यांनी आश्वासन दिलेले आहे.
यावर पुन्हा बंडु धोतरे यांनी यावर्षी जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांचेकडे पाठपुरावा करित निवेदन दिले (23 जाने 2013) त्यावर जिल्हाधिकारी यांनी निरी ला पत्र लिहुन अभ्यासाकरता लागणाÚया खर्चाबाबत अंदाजपत्रक मागतीले होते. यासंदर्भात निरीकडुंन सदर अभ्यासकरीता खर्चाचे अंदाजपत्रक पाठविले होते. यावर पुन्हा बंडु धोतरे यांनी राज्याचे पर्यावरणमंत्री श्री संजय देवतळे यांना मुंबई येथे प्रत्यक्ष भेटीत तापमानवाढीच्या कारणांचा अभ्यास करण्याची गरज पटवून सांगीतली. मंत्री महोदयानी त्यावर पर्यावरण खात्याचे सचिव यांना पत्र पाठवुन त्यादृष्टीने पाठपुरावा करण्याचा सुचना दिल्या.
या अभ्यासकार्याला 2 वर्षाचा कालावधी व अंदाजे 80 लाख रूपये खर्च अपेक्षीत आहे. सध्या चंद्रपूरचे वाढते तापमान व सर्वसामान्याचे जिवनयापन कठीण झाले असल्याने पुन्हा एकदा इको-प्रो तर्फे सदर अभ्यास करण्याकरीता पाठपुरावा केला जात आहे. याकरिता निधी उपलब्ध करून देण्यात आल्यास येत्या काही दिवसात या अभ्यासकार्याला प्रारंभ होण्याची शक्यता आहे.