धाबा- तेन्दु संकलन करण्यासाठी जंगलात गेलेल्या मजुरावर रान डुकराने हल्ला करून त्याना गंभीर रीत्या जखमी केल्याचा दोन घटना धाबा गावापासुन जवळच असलेल्या डोंगरगाव वनपरीक्षेत्रात घडली. त्याना तातळीने गोंडपीपरी येथिल रूग्णालयात भरती करण्यात आले. मात्र जखमी झालेल्या महीलेची प्रकूती गंभीर
असल्याने तिला जिल्हारूग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. या घटनेमुळे तेंन्दु संकलन करणारा मजुरात दहशत पसरली आहे.
सध्या तेंन्दु संकलनाचा हंगाम सुरू आहे. तेंन्दु संकलन करण्यासाठी मोठयाप्रमाणात मजुुर पहाटेच जंगलात जातात. धाबा गावापासुन जवळच असलेल्या डोंगरगाव येथिल शोभाबाई बाबुराव वाढई, पती बाबुराव वाढई हे
दोघे तेंन्दु संकलन करण्यासाठी पहाटेच जंगलात गेले. मध्यचांदा वनविभाग वनपरीक्षेत्र धाबा अंर्तगत येणारा डोंगरगाव वनपरीक्षेत्रातील कक्ष कं्र. 163 मध्ये तेंन्दुसंकलन करीत असतानांच रान डुकराने शोभाबाई वाढई यांचावर हल्ला केला. यात त्याना गंभीर जखम झाली. त्याना तातळीने धाबा येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले. मात्र वैघ्यकीय अधिकारानी त्याना गोंडपीपरी रूग्णालयात रेफर केले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने उपचारासाठी शोभाबाई वाढई यांना जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे. तर दुसरा घटनेत डोंगरगाव येथिलच श्री. तुळशीराम लटारू पींपळकर हे संकलन करीत असताना रान डुकरानी केलेल्या हल्यात जखमी झाले आहेत. त्याना पायावर मोठी जखम झाली आहे. त्याना उपचारासाठी गोंडपीपरी रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. या दोन घटनेमुळे तेंन्दु संकलन करणारा मजुरात दहशत पसरली आहे.